---Advertisement---

WTC मध्ये इतिहास रचण्यापासून कॅप्टन गिल फक्त इतक्या धावा दूर! ठरणार असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय फलंदाज

On: सोमवार, ऑगस्ट 3, 2026 8:25 PM
---Advertisement---

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) पहिला हंगाम 2019 ते 2021 मध्ये खेळवला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत 3 हंगाम झाले असून सध्या चौथा हंगाम सुरू आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात अनेक दिग्गज फलंदाज झाले आहेत. यातील काही फलंदाजांनी WTC मध्ये धावांचा डोंगर उभा केला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंचा विचार केला, तर या यादीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचे वर्चस्व आहे. इंग्लंडचा स्फोटक फलंदाज आणि कसोटी कर्णधार जो रूट (Jo Root) हा एकमेव असा फलंदाज आहे, ज्याने WTC मध्ये 6 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, रूटशिवाय इतर प्रकारच्या कोणत्याही फलंदाजाला आतापर्यंत 5 हजार धावांचा आकडाही पार करता आलेला नाही.

महत्वाची गोष्ट म्हणजे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-10 फलंदाजांमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. या यादीत स्थान मिळवण्याच्या सर्वात जवळ भारतीय कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) आहे.

शुबमन गिल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. गिलच्या नावावर WTC च्या 40 कसोटी सामन्यांच्या 73 डावांत 2843 धावांची नोंद आहे. त्याची सरासरी 43.04 इतकी असून या स्थितीत, श्रीलंका दौऱ्यावरील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत गिलने 157 धावा केल्या, तर तो WTC च्या इतिहासात 3000 धावांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय फलंदाज ठरेल. एवढेच नाही तर, अनेक फलंदाजांना मागे टाकत तो WTC मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-10 फलंदाजांच्या यादीतही सामील होईल. सध्या तो या यादीत 13 व्या स्थानावर आहे.

WTC च्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे भारतीय!

शुबमन गिल – 2843
ऋषभ पंत – 2780
रोहित शर्मा – 2716
विराट कोहली – 2617
रवींद्र जडेजा – 2610

शुबमन गिल श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 157 धावा करून केवळ WTC मध्येच नाही, तर कसोटी क्रिकेटमध्येही स्वतःच्या 3000 धावा पूर्ण करेल. कसोटीत 3000 धावा पूर्ण करणारा गिल हा 28 वा भारतीय फलंदाज ठरेल. गिल पहिल्यांदाच श्रीलंकेत कसोटी मालिका खेळण्यासाठी उतरणार आहे. अशा परिस्थितीत त्याच्यावर धावा करण्यासोबतच टीम इंडियाचं (Team india) नेतृत्व करण्याचं कठीण आव्हान असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---