---Advertisement---

मोठी बातमी! बीसीसीआयनं भाकरी फिरवली, आता टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार!

On: सोमवार, जून 24, 2024 12:22 PM
---Advertisement---

यंदाच्या टी20 विश्वचषकात भारतीय संघ शानदार कामगिरी करत आहे. भारतीय संघाने सुपर-8 मधील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात अफगाणिस्तान आणि बांग्लादेशविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला आहे. तर आज (24 जून) रोजी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. हा सामना भारताने जिंकला किंवा पावसामुळे रद्द झाला, आणि अफगाणिस्तानने बांग्लादेशविरुद्ध सामना जिंकला, तर भारतीय संघाचा सेमीफायनल मध्ये इंग्लंड विरुद्ध मुकाबला होईल. आता यादरम्यान मीडिया रिपोर्टनुसार भारतीय संघास नवा टी20 कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. अश्या स्थितीत रोहित शर्माचं काय होणार? चला तर मग घेऊया संपूर्ण प्रकरण.

यंदाच्या टी20 विश्वषकानंतर 1 जुलैपासून भारतीय संघ झिम्बाब्वे दाैरा करणार आहे. ज्यामध्ये टीम इंडिया टी20 मालिका खेळणार आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार, या मालिकेसाठी भारतीय संघासाठी टी20 मध्ये नवा कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. कारण या मालिकेत बीसीसीआय नव्या खेळाडूंना संघात शामिल करणार आहे. अश्या स्थितीत रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह अश्या वरिष्ठ खेळाडूंना 2025 च्या चॅम्पियन्स ट्राॅफी आणि टेस्ट चॅम्पियशिपसाठी विश्रांती देण्याची शक्यता आहे. तर झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत संघाची धूरा सांभाळण्यासाठी भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलचं नाव चर्चेत आहे. ‘एक्सप्रेस स्पोर्ट्स’च्या रिपोर्टनुसार, झिम्बाब्वे विरुद्धच्या टी20 मालिकेत शुबमन गिलला कर्णधारपद मिळण्याची शक्यता आहे.

2024 च्या टी20 विश्वचषकानंतर राहुल द्रविड संघाच्या मुख्य प्रशिक्षकच्या भूमिकेतून पायउतार होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, झिम्बाब्वे दाैऱ्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून वीवीएस लक्ष्मण असतील, तर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून गाैतम गंभीर टीम इंडियाचे हेड कोच म्हणून पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भारताचा झिम्बाब्वे दाैरा

पहिला टी20 भारत विरुद्ध झिम्बाब्वे 6 जुलै : हरारे
दुसरा टी20 भारत विरुद्ध झिम्बाब्वे 7 जुलै : हरारे
तिसरा टी20 भारत विरुद्ध झिम्बाब्वे 10 जुलै : हरारे
चाैथा टी20 भारत विरुद्ध झिम्बाब्वे 13 जुलै : हरारे

भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध 4 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआय कडून टीम इंडियाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. या मालिकेसाठी बीसीसीआय भारतीय संघात नव्या खेळाडंना स्थान देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्तवाच्या बातम्या-

दक्षिण आफ्रिकेचा यजमानांना दे धक्का! सेमीफायलमध्ये मारली धडक
कांगारुविरुद्ध टीम इंडियाचा दबदबा, टी20 मधील आकडेवारी फारच लाजिरवाणी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? संजू सॅमसनला संघात स्थान मिळेल का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---