न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर क्लीन स्वीप झाल्यानंतर भारतासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात चांगली करणे आवश्यक होतं. पर्थमध्ये असंच घडलं. टीम इंडियानं बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी दारुण पराभव केला. आता मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेडच्या मैदानावर खेळला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज शुबमन गिलबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे.
वास्तविक, गिल बोटाच्या दुखापतीमुळे पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता. पर्थ कसोटीपूर्वीच्या सराव सामन्यादरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. आता समोर आलेल्या ताज्या रिपोर्ट्सनुसार, तो दुसऱ्या सामन्यातही खेळण्याची शक्यता कमी आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, गिलला दुखापत झाल्यानंतर त्याला 10 ते 15 दिवसांच्या आरामाचा सल्ला देण्यात आला होता. तो दुसऱ्या कसोटीपूर्वी सराव सामना खेळणार नाही. सध्या त्याची दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यताही कमीच आहे. दुखापत बरी झाल्यानंतरही त्याला कसोटी सामना खेळण्यासाठी सरावाची आवश्यकता असेल.
शुबमन गिलच्या अनुपस्थितीत, पहिल्या कसोटी सामन्यात डावखुऱ्या देवदत्त पडिक्कलला संधी मिळाली होती. मात्र तो सामन्यात आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला होता. पडिक्कल पहिल्या डावात शून्यावर तर दुसऱ्या डावात 25 धावा करून बाद झाला. आता गिलच्या अनुपस्थितीत त्याला आणखी एक संधी मिळू शकते.
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी आंनदाची बातमी म्हणजे, नियमित कर्णधार रोहित शर्मा भारतीय संघाचा शामिल झाला आहे. तो पत्नीच्या बाळंतपणामुळे पहिला कसोटी सामना खेळला नव्हता. तो दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध झाला आहे. आता रोहित प्लेइंग 11 मध्ये परतल्यानंतर कोणाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. 6 डिसेंबरपासून सुरू होणारी दुसरी कसोटी दिवस-रात्र असेल, हे विशेष.
हेही वाचा –
ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या बजरंग पुनियावर 4 वर्षांची बंदी, कारण धक्कादायक!
पाकिस्तानात हिंसाचार, श्रीलंकेनं मालिका अर्धवट सोडली; इम्रान खान समर्थकांचा गोंधळ
27 कोटींना विकल्या गेलेल्या पंतला पूर्ण पैसे मिळणार नाही, टॅक्समध्ये द्यावी लागणार चक्क इतकी रक्कम!