आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेत पोहोचला आहे आहे. या दौऱ्यावर होणाऱ्या वनडे व टी20 मालिकांमध्ये अनुक्रमे रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करतील. सूर्यकुमार याच्याकडे टी20 संघाचे नेतृत्व देऊन आगामी विश्वचषकापर्यंतचा विचार बीसीसीआयने केल्याचे समजते. या दोन्ही संघांचा उपकर्णधार म्हणून शुबमन गिल याला निवडले गेले आहे. आता त्याबाबत भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी मोठे विधान केले आहे.
गिलच्या नियुक्तीबद्दल विचारले असताना राठोड म्हणाले, “मी त्याला आतापर्यंत आयपीएलमध्ये गुजरात टायटनसाठी व नुकतेच झिम्बाब्वेविरूद्ध नेतृत्व करताना पाहिले. त्याची यावेळी देहबोली पाहण्यासारखी होती. कोणत्याही संघाचे नेतृत्व करण्यासाठी हे गुण आवश्यक असतात. आता त्याच्याकडे वरिष्ठ संघाची जबाबदारी दिली आहे. संघात इतर अनुभवी खेळाडू असताना, या जबाबदारीमुळे तो अधिक चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करेल. मला आशा आहे की, तो एक दिवस नक्कीच भारताचा तिन्ही प्रकारांमध्ये कर्णधार बनेल.”
राठोड यांनी यावेळी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली व विद्यमान कर्णधार रोहित शर्मा यांचे देखील विशेष कौतुक केले. यासोबतच त्यांनी टी20 विश्वचषक विजयादरम्यानच्या अनेक गोष्टींचा उलगडा केला.
गुरुवारी (18 जुलै) श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. रोहित शर्मा याने वनडे संघात पुनरागमन केले. त्यामुळे तो थेट कर्णधार बनला. दुसरीकडे टी20 संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्या याच्या नावाची चर्चा होती. परंतु ऐनवेळी निवडसमितीने सूर्यकुमार यादव याच्या गळ्यात ही माळ घातली. तसेच दोन्ही संघांचा उपकर्णधार म्हणून शुबमन गिल याच्याकडे जबाबदारी दिली गेली. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी देखील, गिल याच्यामध्ये नेतृत्व गुण असल्याचे म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
पाहा, अशी करतात फलंदाजी! गंभीरच्या भारताच्या स्टार फलंदाजाला टिप्स; सराव सत्राचा VIDEO व्हायरल
ICC T20 RANKING: भारतीय महिलांनी आयसीसी टी20 क्रमवारीत घेतली झेप