---Advertisement---

शुभमन पुन्हा अर्धशतकाला शतकात बदलण्यात फेल, १६ डावांनंतरही ‘या’ बेस्ट स्कोरवरच अडलीय गाडी

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 11:43 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपुर येथे खेळवला जात आहे. कसोटीचा पहिला दिवस भारतीय संघाच्या नावे राहिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या दिवशी चार बाद २५८ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा श्रेयस अय्यर ७५ आणि रवींद्र जडेजा ५० धावांवर खेळत होते. या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलने दमदार अर्धशतक झळकावले, पण तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती दिली आहे. अशा परिस्थितीत केएल राहुल आणि मयंक अग्रवाल सलामी देतील आणि शुभमन गिलला किमान पहिल्या कसोटी सामन्यात मधल्या फळीत संधी मिळू शकेल, असे मानले जात होते. मात्र, केएल राहुलला दुखापत झाल्याने शुभमन गिलला सलामीला खेळावे लागले.

न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यात शुभमन गिलने दमदार अर्धशतक झळकावले. त्याने ९३ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या. भारतीय संघाला चांगली सुरुवात करून देण्यासाठी ५२ धावांची ही खेळी पुरेशी होती, पण शुभमन गिलसाठी ही खेळी समाधानकारक म्हणता येणार नाही. कारण गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस भारतीय संघाकडून कसोटीत पदार्पण करणारा शुभमन गिलला चांगली सुरुवात करुनही आतापर्यंत एकही शतक झळकावता आलेले नाही.

या सामन्यात शुभमन गिलला चांगली सुरुवात मिळाली होती. पण या सुरुवातीचे त्याला चांगल्या आणि मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. एवढेच नाही तर त्याने चार वेळा अर्धशतकी खेळी केल्या आहेत, पण एकदाही त्याला आपल्या अर्धशतकाचे रूपांतर शतकात करता आलेले नाही.

आतापर्यंत तो कसोटी क्रिकेटच्या ९ सामन्यांमधील १६ डावांमध्ये खेळला आहे आणि एकदाही त्याला ३ आकडी धावसंख्या गाठता आलेली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या ९१ धावा आहे. शुभमन गिलची ९ सामन्यांच्या १६ डावांनंतर सरासरी ३२.२८ आहे, ही सरासरी सलामीवीर म्हणून कोणत्याही अर्थाने योग्य वाटत नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

भारत-न्यूझीलंड कानपूर कसोटीदरम्यान प्रेक्षकांनी दिले ‘पाकिस्तान मुर्दाबाद’चे नारे, व्हिडिओ व्हायरल

कानपूर कसोटी सुरू असताना श्रीलंकेचा भारताला धक्का, WTC च्या गुणतालिकेत केले ‘ओव्हरटेक’

धुआं-धुआं था वो समा… धुक्याने भरलेल्या कानपूर स्टेडियमला पाहून जाफरला सुचली मस्ती, शेअर केले मीम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---