आयसीसीने सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचे नाव जाहीर केले असून तो भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिल आहे. गेल्या महिन्यात आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान गिलची कामगिरी जबरदस्त होती आणि त्यामुळेच त्याला “प्लेअर ऑफ द मंथ”चा पुरस्कार मिळाला.
सप्टेंबर महिन्यातील प्लेअर ऑप द मंथ पुरस्कारासाठी शुबमन गिल () याच्यासोबत भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि इंग्लंडच्या डेव्हिड मलान यांची नावे स्पर्धेत होती. मात्र गिल या दोघांवर भारी पडला आणि हा पुरस्कार जिंकला. सध्या डेंगु झाल्यामुळे तो विश्वचषकातील पहिले दोन सामने खेळला नव्हता. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी तो अहमदाबादला पोहचला आहे. गिलसाठी सप्टेंबर महिना खुप चांगला गेला होता. या महिन्यात त्याने 8 सामन्यांत 80 च्या सरासरीने 480 धावा केल्या होत्या.
‘प्लेअर ऑफ द मंथ’चा अवॅार्ड जिंकल्यानंतर काय म्हणाला गिल
सप्टेंबर महिन्याचा आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ हा पुरस्कार जिंकल्याचा मला आनंद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि संघासाठी योगदान देणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या पुरस्कारामुळे चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल. आशिया चषक 2023 जिंकणाऱ्या आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिका जिंकणाऱ्या संघासाठी मी चांगले योगदान देऊ शकलो. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे, कुटुंबाचे आणि प्रशिक्षकांचे आभार मानतो, ज्यांच्याशिवाय हे यश मिळू शकले नसते.
महिलांमधून श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टू ठरली विजेती
श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टूने संघाला इंग्लंडविरुद्ध क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात पहिली मालिका जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिने इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांत 104 धावा आणि 5 विकेट्स घेतल्या होत्या. तिने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतही काही महत्त्वाच्या खेळी खेळल्या. तिने सप्टेंबर महिन्यात एकूण 208 धावा केल्या होत्या.
‘प्लेअर ऑफ द मंथ’चा अवॅार्ड जिंकल्यानंतर काय म्हणाली चामारी अटापट्टू
हा पुरस्कार माझ्यासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी आणि आमच्या चाहत्यांसाठी निश्चितच प्रोत्साहन देणारा ठरेल, जे संपूर्ण वेळ संघासोबत आहेत, आणि आमच्या युवा क्रिकेटपटूंसाठी देखील प्रोत्साहन असेल. (ICC Player of the Month award announced This Indian player hit the bet)
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटप्रेमींचे स्वप्न होणार पूर्ण! आता ऑलिम्पिकमध्येही ‘रन’संग्राम, अमेरिकेची निर्णायक भूमिका
BAN vs NZ । शाकिब मुशफिकूरने रचला इतिहासात, शतकी भागीदारी झाली नाही पण…