---Advertisement---

‘ब्रेकअप झालाय का?’ शुबमन गिलच्या ‘या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण

On: बुधवार, नोव्हेंबर 3, 2021 1:38 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिल सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. शुबमन गिलला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघला निवडले गेले नाही. असे असले तरी, तो आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाचा एक महत्वाचा भाग राहिला आहे. गिलने मंगळवारी (२ नोव्हेंबर) त्याच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यांवरुन एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तो चर्चेत आला आहे.

त्याने या पोस्टमध्ये चाहत्यांनी प्रेमात न पडण्याचा संदेश दिला आहे. मात्र, चाहते गिलल्या या पोस्टनंतर त्याचा ब्रेकअप झाल्याचा अंदाज लावत आहेत.

मागच्या बऱ्याच काळापासून गिल आणि दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा सोशल मीडियावर होत आल्या आहेत. सारा तेंडुलकर इंस्टाग्रामवर गिल आणि त्याच्या भावंडांनाही फॉलो करते. तसेच हे दोघे एकमेकांच्या पोस्टवर लाइक आणि कमेंट्सही करतात. याच पार्श्वभूमीवर चाहत्यांनी या दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा अनेकदा केल्या आहेत.  आता गिलने केलेल्या या नवीन पोस्टनंतर या दोघांच्या ब्रेकअपची चर्चा चाहत्यांनी सुरू केली आहे.

मागच्या काही दिवसांपूर्वी गिलने इंस्टाग्रामवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली होते. यावेळी एका चाहत्याने प्रेमसंबंधाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गिलने तो सिंगल असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच भविष्यातही याविषयी त्याने काही विचार केला नसल्याचे त्याने यावेळी सांगितले होते.

मात्र नव्या पोस्टनंतर त्याच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सिग्मा रूल नंबर १’ गिलचा पहिला नियम त्याच्या टीशर्टवर दिसत आहे. त्याच्या टी शर्टवर स्पष्टपणे लिहिले आहे की, ‘पऱ्यांच्या प्रेमात पडू नका.’

गिलच्या या पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने तर खूप स्पष्ट कमेंट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “शहरात दवंडी द्या, मामा गिलचा ब्रेकअप झाला आहे.”

https://twitter.com/Rajneesh_16/status/1455506089332510721

https://twitter.com/Joker122018/status/1455501523035705352

https://twitter.com/Sarcasticvihari/status/1455502026297667585

https://twitter.com/akshat_1301/status/1455522769672704000

https://twitter.com/NatttuKaka/status/1455543711857844236

https://twitter.com/_MansiMishra/status/1455532306593206272

शुबमन गिलने आत्तापर्यंत भारताकडून ८ कसोटी सामने आणि ३ वनडे सामने खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

टी२०मध्ये बाबर आझम ‘कर्णधार’ विराट कोहलीला ठरतोय सरस, आता ‘या’ विक्रमात दिला धोबीपछाड

‘तो विवियन रिचर्ड्सप्रमाणे विध्वंसक खेळ करतो’, शेन वॉर्नने ‘या’ फलंदाजाचे गायले गोडवे

जॉस बटलरच्या आक्रमक खेळीने बेन स्टोक्सही भलताच प्रभावित; ट्वीट करत म्हटला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---