बीसीसीआयने जूनमध्ये सुरू (India Tour England) होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी 24 मे रोजी संघाची घोषणा केली. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुबमन गिलची नवीन कसोटी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यात टीम इंडिया 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. कसोटी कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गिलची पहिली प्रतिक्रिया आली आहे. बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत त्याने हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली आहे. (Shubman Gill; Test Team Captain)
गेल्या दशकाहून अधिक काळानंतर असे घडत आहे जेव्हा विराट कोहली, रोहित शर्मा किंवा आर. अश्विन यांच्यापैकी कोणीही कसोटी मालिकेचा भाग असणार नाही. तिन्ही दिग्गज खेळाडूंनी अलीकडेच कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. 25 वर्षीय शुबमन गिलसाठी या मालिकेत अनेक आव्हाने असतील, जरी त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आहे आणि अव्वल स्थानावर आहे. परंतु क्रिकेटच्या या दीर्घ स्वरूपात तो किती यशस्वी होतो का? हे पाहणे बाकी आहे. कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर गिलने हे देखील मान्य केले की या पदासह त्याच्यावर मोठी जबाबदारी देखील असेल.
“क्रिकेटची सुरुवात करताना प्रत्येक खेळाडूचं एकच स्वप्न असतं. भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं. माझंही तेच स्वप्न होतं. पण केवळ भारतासाठी खेळणंच नाही, तर कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने योगदान देणं हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं होतं.
आज जेव्हा मला या महान खेळात भारताचं कसोटी नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे, तेव्हा ती केवळ सन्मानाची बाब नाही, तर एक मोठी जबाबदारीही आहे. या पवित्र पदासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आहे आणि मी त्या पूर्ण समर्पणाने पार पाडण्याचा प्रयत्न करेन.” बीसीसीआयने अद्याप मुलाखतीचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केलेला नाही. (Shubman Gill Reation After selected as a captain of Test team)
गिलच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 26 डिसेंबर 2020 रोजी पदार्पण केले. तेव्हापासून, त्याने 32 सामन्यांमध्ये 35.05 च्या सरासरीने 1893 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 5 शतके आणि 7 अर्धशतके आहेत.






