भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साउथम्पटन येथे विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना चालू आहे. या सामन्यात युवा सलामीवीर शुभमन गिल याने पहिल्या डावात २८ धावांचे योगदान दिले आहे. नुकतेच त्याने त्याच्या कारकिर्दीतील काही जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. शुभमनने त्याचा आदर्श विराट कोहलीसोबतच्या पहिल्या भेटीबद्दलच्या आठवणीही सांगितल्या आहेत.
युवा फलंदाज शुभमनने सांगितले की, सर्वप्रथम त्याची आणि भारतीय संघाचा कर्णधार कोहली यांची २०१६ मध्ये भेट झाली होती. गिलने सांगितले की तो कोहलीला आपला आदर्श मानतो. जेव्हा त्याला विराटला पहिल्यांदा भेटायची संधी मिळाली, तेव्हा तो त्याला काहीच बोलू शकला नव्हता.
आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शुभमन गिल आपल्या काही इंस्टा आठवणींबद्दल बोलला आहे. त्यातील पहिले पोस्ट हे बीसीसीआयच्या २०१४-२०१५ च्या वार्षिक सोहळ्याचे आहे, जिथे कोहलीने पहिला पॉली उमरीगर पुरस्कार जिंकला होता. याचवर्षी गिलला सलग दुसर्या वर्षी ज्युनिअर क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आले होते.
या आठवणीबद्दल गिल म्हणाला, “विराट कोहलीबरोबर राहणे खूप प्रेरणादायक क्षण होते आणि जेव्हा मी क्रिकेट खेळू लागलो तेव्हापासून ते माझ्या आदर्श आहे. लहान असताना क्रिकेटविषयी तुम्हाला फारशी माहिती नसते. आपल्याला फक्त मनोरंजनासाठी क्रिकेट खेळायचे असते. परंतु एकदा आपण खेळायला सुरुवात केल्यावर आव्हाने आणि खेळाबद्दल बरेच काही शिकत जातो. मुंबईत मी त्याला प्रथमच भेटलो. हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता.”
शुभमन गिल बीसीसीआयच्या वार्षिक कार्यक्रमाच्या मागील आवृत्तीबद्दल बोलला, जिथे तो प्रथमच ज्युनिअर क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून गौरविण्यात आला होता. २१ वर्षीय शुभमनने सांगितले की, “माझ्या मते २०१४ मध्ये मी जेव्हा अंडर-१६ जुनिअर क्रिकेटर ऑफ द ईयर बनलो होतो. त्याचा कार्यक्रम मुंबईमध्ये होता. परंतु मला माहित नव्हते की यावेळेस माझी भेट विराट भाईसोबत होणार. कारण मी खूप लाजाळू होतो व त्यांच्याशी बोलू शकलो नव्हतो.”
Meeting Virat Kohli, quality time with the family, and a famous win at the Gabba.
A walk down memory lane through Insta Memories with @RealShubmanGill.#WTC21 pic.twitter.com/Z3nZ492Hf6
— ICC (@ICC) June 21, 2021
https://www.instagram.com/p/BAL-cx0EBVy/?utm_source=ig_web_button_share_sheet
शुभमन गिलने गाबा कसोटी सामन्याचा अनुभव सांगितला
गाबा कसोटीबद्दल बोलताना शुभमन गिल म्हणाला की, शेवटच्या दिवशी हा सामना जिंकल्यानंतर आणि मालिका जिंकल्यानंतर मिळालेली भावना अविस्मरणीय होती.
तो म्हणाला, “ही कसोटी कशी सुरू झाली आणि ती कशी संपली हे सर्वांना माहिती आहे. हे पूर्णपणे भिन्न होते. पाचव्या दिवशी आम्ही जेव्हा सामना जिंकलो आणि मालिकाही जिंकलो, तेव्हा ट्रॉफी घेतानाच्या भावना या अविस्मरणीय होत्या .”
महत्वाच्या बातम्या
WTC अंतिम सामना अनिर्णीत राहिल्यास भारताचा मोठा तोटा तर न्यूझीलंड फायद्यात; बघा कसं?
आजच्याच दिवशी टीम इंडियाने खेळला होता विश्वचषकाचा ‘तो’ अजरामर सामना, संपूर्ण देशाला आलं होतं गहिवरुन
कसोटी अजिंक्यपदचा पहिलावहिला विजेता मिळण्यासाठी दिग्गजांनी सुचवले ‘हे’ समर्पक पर्याय