भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला २- १ ने पराभूत केले होते. या मालिकेत भारतीय संघातील युवा खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली होती. याच कामगिरीवर आनंदीत होऊन आनंद महिंद्रा यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळलेल्या युवा खेळाडूंना थार एसयूव्ही देण्याचे वचन दिले होते. त्यांनी दिलेला हा शब्द पाळला आहे. शार्दुल ठाकूर, टी नटराजन, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरनंतर आता शुबमन गिलला देखील ही गाडी भेट म्हणून मिळाली आहे.
आनंद महिंद्रा यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भेट देण्याचे ठरवले होते. यात शुबमन गिल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, टी नटराजन,वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांचा समावेश होता.
शुबमन गिलला ही गाडी भेट मिळाल्यानंतर त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फोटोज् शेअर करत आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले की,” ही महिंद्रा थार गाडी मिळवणे एक अप्रतिम अनुभव होता. मी ही गाडी भेट दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे. ही भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भारतासाठी खेळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मी माझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल.”
शुबमन गिल सध्या आयपीएल स्पर्धा खेळण्यात व्यस्त असल्यामुळे त्याच्या कुटंबीयांनी ही भेट स्वीकारली आहे.
It's a great feeling to receive the Mahindra Thar and I wish was there to collect this beast. @anandmahindra Sir I am grateful and a big thank you to you for this gesture. Playing for India has been an honour and I will strive to give my best everytime I step out on the field. pic.twitter.com/Dj82w1oSJ8
— Shubman Gill (@ShubmanGill) April 20, 2021
टी नटराजनलाही मिळाली होती भेट
टी नटराजनने भेट मिळाल्यानंतर लिहिले होते की,” या अद्भुत भेटवस्तू आणि प्रोत्साहनाबद्दल श्री. आनंद महिंद्रा यांचे मनापासून आभार. हे आम्हा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. मला पूर्ण खात्री आहे की,तुमचे हेच समर्थन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद सर .” याबरोबरच नटराजनने महिंद्रा यांना ब्रिस्बेन कसोटीत घातलेली जर्सी स्वाक्षरी करुन रिटर्न गिफ्ट म्हणून पाठवली होती.
https://twitter.com/Natarajan_91/status/1377602838776344581
वॉशिंग्टन सुंदरला गाडी मिळाल्यानंतर त्याने लिहिले होते की
सुंदरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर करत आनंद महिंद्रा यांचे आभार मानले होते. त्याने गाडी सोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले होते की, ” या अद्भुत भेटवस्तू आणि प्रोत्साहनाबद्दल श्री. आनंद महिंद्रा यांचे मनापासून आभार.हे आम्हा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. मला पूर्ण खात्री आहे की, तुमचे हेच समर्थन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल. तुमचे मनापासून आभार.”
Filled with immense gratitude to Shri @anandmahindra for this wonderful gift & all the encouragement that you provide us youngsters. I’m certain that your support will motivate many to take up a sport and bring more laurels to our country! ???????? Many thanks and best regards sir. pic.twitter.com/uCNv26Q8P7
— Washington Sundar (@Sundarwashi5) April 6, 2021
शुबमन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकला
शुबमनने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्याच कसोटी मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली. त्याने ३ सामन्यात २ अर्धशतकांसह ५१.८० च्या सरासरीने २५९ धावा केल्या होत्या. ९१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० क्रिकेटमध्ये केएल राहुल विराट, रोहितलाही भारी, ४ धावावंर बाद होऊनही केलाय ‘हा’ मोठा विक्रम
Video: लाईव्ह सामन्यात रिषभची सटकली; संघ सहकाऱ्याला म्हणाला, ‘शरीर मोकळं सोडून खेळ जरा’






