मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना खेळला जात आहे. या सामन्यातून मोठी बातमी समोर येत आहे. चांगल्या लयीत असलेला भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुबमन गिल हा मैदानातून बाहेर पडला आहे. शुबमनला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला मैदानातून बाहेर पडावे लागले आहे. गिल बाहेर पडल्यामुळे भारतीय संघाला धक्का असल्याचे बोलले जात आहे.
नेमकं काय घडलं?
झाले असे की, भारतीय डावातील 23वे षटक मिचेल सँटनर टाकत होता. यावेळी त्याने चौथा चेंडू स्ट्राईकवर असलेल्या विराट कोहली याला टाकला. यावर विराटने एक धाव घेतली. यावेळी धाव घेताना शुबमन गिल (Shubman Gill) याच्या पायाच्या मांसपेशी ताणल्या गेल्या. त्यानंतर मैदानावर फिजिओ आले आणि त्यांनी त्याच्यावर उपचारही केले. मात्र, तरीही त्याला आराम पडला नाही. त्यामुळे गिलने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.
Shubman Gill retired hurt. pic.twitter.com/JUDhLKIIeq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2023
गिलचे अर्धशतक
भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी गिल रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत सलामीला उतरला होता. रोहित 47 धावांवर बाद झाल्यानंतर गिलने मोर्चा सांभाळला. तो चौकार-षटकारांचा पाऊस पाडत वेगाने धावा करत हता. मात्र, शुबमन गिल हॅमस्ट्रिंग (Shubman Gill Hamstring) दुखापतीमुळे जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही.
शुबमनने यावेळी 65 चेंडूंचा सामना केला. यामध्ये त्याने 79 धावांची झंझावाती खेळी केली. हे त्याचे कारकीर्दीतील 13वे अर्धशतक होते. त्याच्या या खेळीत 3 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. शुबमन गिल रिटायर्ड हर्ट (Shubman Gill Retired Hurt) होऊन जेव्हा मैदानातून बाहेर आला, तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 22.4 षटकात 1 बाद 164 होती. (shubman gill retired hurt ind vs nz world cup 2023)
हेही वाचा-
वीर विराट! बनला वनडेतील तिसरा सर्वात यशस्वी फलंदाज, विश्वविजेत्या कर्णधाराचे आकडे पडले फिके
World Cup Semifinal: वीरेंद्र सेहवागचा टीम इंडियाला मोलाचा सल्ला; म्हणाला, ’11 खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी…’