आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वात महत्त्वाचा पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड या बलाढ्य संघात खेळला जात आहे. बुधवारी (15 नोव्हेंबर) वानखेडे स्टेडिअम येथे या सामन्याला सुरुवात झाली. तब्बल 12 वर्षानंतर वानखेडे स्टेडियम येथे होत असलेल्या सामन्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.
भारतीय संघ या सामन्यात विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेशासाठी आतुर आहे. न्यूझीलंड संघानेच मागील विश्वचषकात भारताला पराभूत करत स्पर्धेतून बाहेर काढले होते. त्यामुळे या सामन्याला अधिकचे महत्व प्राप्त झाले.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1724700278191165614?t=SbjdXPmR7h6sc8WNVmA1mg&s=19
या सामन्यासाठी भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा ट्रॉफी घेऊन मैदानात हजर झाला होता. तसेच वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स हे देखील या सामन्यासाठी मुंबईत आले आहेत. यासोबतच इंग्लंडचा सर्वकालीन महान फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम हा देखील खास या सामन्यासाठी पोहोचला आहे.
https://twitter.com/sports_new92609/status/1724714830685417628?t=64KbBp0AmUXasrZe3rIqyw&s=19
याव्यतिरिक्त भारतातील देखील अनेक सेलिब्रिटी व नामांकित व्यक्ती वानखेडे स्टेडियमवर दाखल झाले आहेत. यामध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या नीता अंबानी, आकाश अंबानी, प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर, अभिनेता जॉन अब्राहम व सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री कियारा अडवाणी हे देखील वानखेडे स्टेडियमवर हजर झाले आहेत. तसेच सचिन तेंडुलकर याची कन्या सारा तेंडुलकर, विराट कोहली याची पत्नी अनुष्का व रोहित शर्माची पत्नी रितिका हे देखील या सामन्यासाठी पोहोचले आहेत.
(World Cup Semi Final David Beckham Ambanis And Ranbir Kapoor Attend INDvNZ At Wankhede Stadium)
हेही वाचा-
India vs New Zealand: भारताने जिंकला Toss, सेमीफायनल जिंकण्यासाठी रोहित उतरवणार ‘या’ 11 खेळाडूंना मैदानात
IND vs NZ Pitch Controversy: सेमीफायनलपूर्वी मोठा वाद, BCCIवर खेळपट्टी बदलण्याचा आरोप; लगेच वाचा