---Advertisement---

गंभीरच्या एका सल्ल्याने बदललं खेळाचं चित्र, गिलची 269 धावांची तुफानी खेळी ठरली निर्णायक!

---Advertisement---

एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवसही भारताच्या बाजूने राहिला. कर्णधार शुबमन गिलच्या विक्रमी द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 587 धावा केल्या. गिलने आपल्या 269 धावांच्या खेळीत 387 चेंडूंचा सामना करत 30 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार मारले. सामन्यानंतर गिलने खुलासा केला की डावाच्या सुरुवातीला त्याला चौकार मारता येत नसल्याने तो संघर्ष करत होता. प्रशिक्षक गौतम गंभीरने त्याला याबद्दल सल्ला दिला आणि त्याच्या सल्ल्याने कर्णधाराला यश मिळविण्यात मदत झाली. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने 77 धावांवर 3 विकेट गमावल्या होत्या. भारताकडे अजूनही 510 धावांची आघाडी आहे.

गिलने त्याच्या डावाच्या सुरुवातीला कसा संघर्ष करत होता. सातत्याने चौकार मारू शकत नव्हता याची आठवण करून दिली. गिलने ब्रॉडकास्टर्सशी बोलताना सांगितले की, त्याने गंभीरशी बोलून त्याला सांगितले की तो सतत क्षेत्ररक्षकांचा शोध घेत आहे. गिल म्हणाला की भारतीय प्रशिक्षकाने त्याला धीर धरायला सांगितले आणि धावा होतील.

शुबमन गिल म्हणाला, “काल जेवणाच्या ब्रेकमध्ये मी मैदानावर आलो तेव्हा मी स्वतःला खेळात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. सुमारे 100 चेंडू खेळल्यानंतर चहाच्या वेळी मी 35-40 धावांवर होतो. मी ड्रेसिंग रूममध्ये गेलो आणि जीजी भाईंशी (गौतम गंभीर) बोललो. मी त्यांना सांगितले की मी चौकार मारू शकत नाही, मी क्षेत्ररक्षक शोधत आहे. त्यांनी मला धीर धरायला सांगितले.”

गौतम गंभीरच्या सल्ल्यानुसार, शुबमन गिलने चौकार न मारताही हास्यास्पद शॉट्स खेळले नाहीत. हळूहळू, त्याने चौकार मारण्यास सुरुवात केली आणि इंग्लिश गोलंदाजांना धुळ चारु लागला. शुबमन गिल हा SENA देशांमध्ये द्विशतक करणारा पहिला आशियाई फलंदाज आहे. शिवाय तो भारतीय कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा खेळाडूही बनला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---