भारतीय क्रिकेटपटू सध्या बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेच्या तयारीत व्यस्त आहेत. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत जागा मिळवण्यासाठी अनेक स्टार क्रिकेटपटू दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सराव करणार आहेत. भारताचा युवा सलामीवीर आणि भावी स्टार शुबमन गिल हादेखील या स्पर्धेत आपल्या कमकुवत बाजूंवर काम करताना दिसेल. यासंदर्भात त्याने स्वत: माहिती दिली आहे.
भारतीय संघाला पुढील 4 महिन्यांत 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंचा फिटनेस आणि त्यांची कामगिरी खूप महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या काही काळापासून, भारतीय संघातील खेळाडू फिरकी गोलंदाजांविरुद्ध खूप संघर्ष करताना दिसत आहेत. आता गिलने सांगितले आहे की, तो याला कसा सामोरे जाईल?
गिल दुलीप ट्रॉफी 2025 मध्ये भारत अ संघाचे नेतृत्व करत आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तो म्हणाला की, “मी फिरकीपटूंविरुद्ध माझ्या बचावावर काम केले आहे. कारण जेव्हा तुम्ही टर्निंग पिचवर खेळत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या विकेट्सही वाचवाव्या लागतात. अलीकडच्या काळात, सपाट ट्रॅकवर खेळण्याऐवजी फलंदाजीसाठी योग्य खेळपट्ट्यांवर अधिक टी20 सामने खेळले जात आहेत, त्यामुळेच आगामी कसोटी मालिकेत माझा बचावात्मक खेळ मजबूत करण्यावर अधिक भर असेल.”
कसोटीतील प्रदर्शनावर नाखूश आहे गिल
गिलला असा विश्वास आहे की, त्याची कसोटी कारकीर्द अपेक्षेनुसार अद्याप शिखरावर पोहोचली नाही. गिलने या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत जवळपास 500 धावा केल्या होत्या. जी त्याची कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. आता त्याला 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत आणखी सुधारणा करायची असून, ज्यामध्ये त्याच्यासमोर पाहुण्या संघातील अनुभवी फिरकीपटूंचे आव्हान असेल.
तो म्हणाला, “कसोटी क्रिकेटमध्ये माझी आतापर्यंतची कामगिरी माझ्या अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. मात्र, या हंगामात आम्हाला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. जेव्हा मी या सामन्यांनंतर मागे वळून पाहिल तेव्हा मला आशा आहे की, माझ्या अपेक्षा पूर्ण होतील. एक खेळाडू म्हणून वैयक्तिकरित्या परिपक्व होण्यावर भर मी देईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा टीम इंडियाची वाट खडतर; मोठ्या स्पर्धेपूर्वी ईशान किशन संघाबाहेर!
ऑस्ट्रेलियाची त्यांच्याच घरात पळता भुई थोडी करू; भारताच्या माजी संघ निवडकर्त्याचा विश्वास
उंची 6 फूट 7 इंच, अवघ्या 20 वर्षाचा गोलंदाज करणार इंग्लंडसाठी कसोटी पदार्पण!