भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातिल चौथा आणि शेवटचा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. उभय संघांतील या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभी केली. प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीर शुबमन गिल याने शतक ठोकले. गिलच्या कसोटी कारकिर्दीतील हे त्याचे दुसरे शतक ठरले.
बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने भारताने, तर एक सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल होती. पण चौथ्या कसोटीतील खेळपट्टीवर फळंदाज चांगले प्रदर्शन करताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 480 धावा साकारल्या. सलामीवीर उस्मान ख्वाजा 180, तर कॅमरून ग्रीन याने 114 धावांवर विकेट गमावली. ऑस्ट्रेलियन संघाने ही मोठी धावसंख्या उभी केल्यानंतर भारतीय सलामीवीर शुमन गिल याने 194 चेंडूत स्वतःचे शतक पूर्ण केले. यादरम्यान गिलच्या बॅटमधून 10 चौकार आणि 1 षटकार निघाले.
CENTURY for @ShubmanGill 👏👏
A brilliant 💯 for #TeamIndia opener. His 2nd in Test cricket.#INDvAUS pic.twitter.com/shU2nuWLWo
— BCCI (@BCCI) March 11, 2023
पहिल्या डावात 480 धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघ रोहित आणि गिल सलामीला आले. फलंदाजीला आल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि गिल या दोघांनी दुसरा दिवस एकही विकेट न गमावती 36 धावा करून संपवला. पण कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा 444 धावांनी आघाडीवर होता. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात रोहितच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. रोहितने 58 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. त्यानंतर फलंदाजीला तिसऱ्या क्रमांकावर आला चेतेश्वर पुजारा. पुजारा आणि गिल यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी झाली. पुजाराने पहिल्या डावातील 62व्या षटकात 42 धावा करून विकेट गमावली.
तत्पूर्वी भारतीय संघासाठी पहिल्या डावात रविचंद्रन अश्विन सर्वात किफायतशीर गोलंदाज ठरला. अश्विनने टाकलेल्या 47.2 षटकांमध्ये 91 धावा खर्च करत सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने 2, तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
(Shubman Gill scored a century in the Ahmedabad Test against Australia)
बातमी अपडेट होत आहे …
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंत नाहीये म्हणून काय झालं, दिल्लीला मिळाला नवीन पॉवर हिटर; बाबरच्या संघाविरुद्ध ठोकलं वेगवान शतक
चौथ्या कसोटीत 9 धावा करताच पुजाराचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त विक्रम, यादीत विराटचा नंबर शेवटचा