भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सलामीवीर शुबमन गिल याने वनडे क्रिकेटमधील आपला फॉर्म कायम राखत टी20 क्रिकेटमधील पहिले शतक पूर्ण केले. तसेच तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो भारताचा पाचवा फलंदाज बनला. याबरोबरच भारतासाठी टी20 मध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बनवण्याचा मान देखील त्याने मिळवला.
पहिल्या दोन सामन्यात फारशी चांगली कामगिरी करण्यात त्याला अपयश आलेले. मात्र, या सामन्यातील पहिल्या षटकापासून त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. 35 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केल्यानंतर त्याने धावांचा वेग आणखी वाढवत 54 चेंडूंमध्ये आपले पहिले शतक पूर्ण केले. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 63 चेंडूवर 126 धावा कुटल्या. यामध्ये 12 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता.
गिलने या शतकादरम्यान अनेक विक्रमही आपल्या नावे जमा केले. भारतासाठी सर्वात कमी वयात टी20 शतक झळकावणारा फलंदाज बनण्याचा मान त्याला मिळाला. यासोबतच त्याने भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये भारतासाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बनवण्याचा मान मिळवला. यापूर्वी हा विक्रम विराट कोहली याच्या नावे होता.
विराटने मागील वर्षी आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध आपले पहिले टी20 शतक पूर्ण करताना नाबाद 122 धावा केल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारतीय कर्णधार रोहित शर्मा याचा क्रमांक लागतो. त्याने श्रीलंकेविरुद्ध 2017 मध्ये 118 धावा केल्या होत्या.
भारतासाठी टी20 मध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
शुबमन गिल (126*) वि न्यूझीलंड
विराट कोहली (122*) वि अफगाणिस्तान
रोहित शर्मा (118) वि श्रीलंका
सूर्यकुमार यादव (117) वि इंग्लंड
(Shubman Gill Scored Highest Individual Score For India In T20I)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूची मोठी घोषणा, कसोटी क्रिकेटमधून घेतला अनिश्चित काळासाठी ब्रेक
अर्थसंकल्पात क्रीडाक्षेत्राला मिळाले भरभरून! इतिहासात प्रथमच 3000 पेक्षा जास्त कोटींची तरतूद