भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजे बीसीसीआयने मंगळवारी (23 जानेवारी) गुणवंत खेळाडूंना सन्मानित केले. भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल याने मागच्या हंगामात म्हणजे 2022-23 मध्ये जबरदस्त प्रदर्शन केले. यासाठी त्याला बीसीसीआयकडून पॉल उमरीगर पुरस्कार दिला गेला. आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये हंगामात सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. हा सन्मान मिळाल्यानंतर गिलने आपल्या अधिकृत सोशल मीडिया कात्यावरून एक खास पोस्ट शेअर केली, जाची सर्वत्र चर्चा होत आहे.
शुबमन गिल (Shubman Gill) मागच्या काही वर्षांमध्ये सर्वांना माहीत झाला. पण प्लेअर ऑफ द इयर ठरण्यासाठी त्याला जबरदस्त प्रदर्शन करावे लागले. या प्रदर्शनामागे गिलची मागच्या अनेक वर्षांपासूनची मेहनत आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने आपल्या इंस्टाग्रामवर 10 वर्षांपूर्वीचा एक फोटो एसअर केला आहे. हा फोटो बीसीसीआयच्या पुरस्कार वितरण सोहळ्यातील आहे. “14 वर्षांपूर्वी मी इथे आलो होतो. माझी प्रेरणा आणि दिग्गजाला (विराट कोहली) पहिल्यांदा भेटलो होतो. विराटला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकताना पाहणे मी कधीच विसरणार नाही. हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणा आहे, ज्यामुळे पुढे जात राहील आणि आपल्या देशासाठी पूर्ण योगदान देईल.”
View this post on Instagram
गिलने सांगितल्याप्रमाणे विराटसोबतच्या या फोटोत तो 14 वर्षांचा आहे. सध्या त्याचे वय 24 वर्ष असून यावरून विराट आणि गिलच्या पहिला 10 वर्ष झाल्याचे समजते. दरम्यान मागच्या हंगामात म्हणजे 2022-23 मध्ये गिलने एकूण 25 सामने खेळले. यातील 28 डावांमध्ये गिलने 1325 धावांचे योगदान भारतीय संघासाठी दिले. 208 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. एक द्विशतक, 6 शतके आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने त्याने या धावा केल्या. यादरम्यान गिलची सरासरी धावसंख्या 53.00, तर स्ट्राईक रेट 94.23 होता.
महत्वाच्या बातम्या –
AUS vs WI । ऑस्ट्रेलिया संघावर कोरोना व्हायरसचा अटॅक! मुख्य प्रशिक्षकासह महत्वाच्या खेळाडूला लागण
IND vs ENG । हैदराबाद कसोटीतून अँडरसनचा पत्ता कट! ‘हे’ तीन फिरकीपटून ठरवतील सामन्याचा निकाल