---Advertisement---

भारताला नडणाऱ्या किवी गोलंदाजाला शुभमनने ठोकला कडक षटकार, कपिल यांची करुन दिली आठवण

On: गुरूवार, नोव्हेंबर 25, 2021 10:08 PM
---Advertisement---

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारतीय संघाच्या नावे राहिला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने गुरुवारी (२५ नोव्हेंबर) कानपूरमधील ग्रीन पार्क येथे कसोटीच्या पहिल्या दिवशी चार बाद २५८ धावा केल्या. पहिल्या दिवसाखेर खेळ थांबला तेव्हा श्रेयस अय्यर ७५ आणि रवींद्र जडेजा ५० धावांवर खेळत होते. खराब प्रकाशामुळे दिवसाची सहा षटके खेळली गेली नाहीत. या सामन्यात शुभमन गिलने एक उत्कृष्ट षटकार ठोकला, ज्याची खूप चर्चा झाली.

न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताचा सलामीवीर शुभमन गिल चांगलाच फॉर्मात दिसत होता. मयंक अग्रवालसह डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या गिलने शानदार फलंदाजी करताना कसोटी कारकिर्दीतील चौथे अर्धशतक झळकावले. त्याने ९३ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५२ धावा केल्या.

दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडलेल्या गिलने या सामन्यातून पुनरागमन केले. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत गिलला मधल्या फळीत फलंदाजी करावी लागणार होती. पण केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर गिलला सलामीची संधी मिळाली आहे. याच गिलने भारतीय डावातील पहिला षटकार डावाच्या सतराव्या षटकात एजाज पटेलच्या गोलंदाजीवर लगावला. पटेलच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, गिलने खेळपट्टीवर पुढे जात लाँग ऑनवर उत्तुंग षटकार ठोकला.

या सामन्यात समालोचन करणाऱ्या सुनील गावसकर यांनीही गिलच्या शॉटचे कौतुक केले. गावसकर यांनी म्हटले की, त्यांना गिलच्या शॉटमध्ये माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव यांची झलक दिसली. चांगल्या सुरुवातीनंतर त्याला आपल्या डावाचे शतकात रूपांतर करता आले नाही. त्याला वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

https://twitter.com/CowCorner9/status/1463742361897291781?s=20

तत्पूर्वी, सलामीवीर मयांक अग्रवालने १३ धावा करून बाद झाला. शुभमन गिल ९३ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याला जेमिसनने त्रिफळाचीत केले. चेतेश्वर पुजारा ८८ चेंडूत २६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने २ चौकार मारले. त्याला वेगवान गोलंदाज टीम साऊदीने बाद केले. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे ३५ धावा करून बाद झाला. त्याने ६३ चेंडू खेळले आणि ६ चौकार मारले. त्याला जेमिसनने त्रिफळाचीत केले.

महत्त्वाच्या बातम्या-

द्रविडला गोष्टी बदललेल्या आवडत नाही म्हणतात, तेच खरे! संघाच्या जुन्या प्रथेची पुन्हा केली सुरुवात

मुंबई इंडियन्सचे सह-संघमालक यूएई टी२० लीगमध्ये खरेदी करणार आहेत संघ, तयारीही झालीय पूर्ण

‘हे’ ५ क्रिकेटर ठरू शकतात चेतेश्वर पुजारासाठी धोक्याची घंटा, घेऊ शकतात कसोटी संघातील जागा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---