आयपीएल २०२१ स्पर्धेतील एलिमिनेटरच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला स्पर्धेबाहेर केले होते. त्यानंतर क्वालिफायर २ च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते. या अटीतटीच्या लढतीत शेवटच्या षटकात राहुल त्रिपाठीने षटकार खेचल्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाने विजय मिळवला होता. दरम्यान, या डावात क्षेत्ररक्षण करत असताना, शुबमन गिलने अविश्वसनीय झेल टिपला होता. परंतु त्यानंतर जे झाले, ते पाहून केकेआरच्या चाहत्यांचे हृदय तुटले होते.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून शिखर धवनने सर्वाधिक ३६ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने १ चौकार आणि २ षटकार मारले होते. तर श्रेयस अय्यरने नाबाद ३० धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने १ चौकार आणि १ षटकार मारला होता. या खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटक अखेर ५ बाद १३५ धावा करण्यात यश आले होते.
शूबमन गिलचा अविश्वसनीय झेल
तर झाले असे की, दिल्ली कॅपिटल्स संघाची फलंदाजी सुरू असताना १७ वे षटक टाकण्यासाठी वरूण चक्रवर्ती गोलंदाजीला आला होता. तर, शिमरोन हेटमायर फलंदाजीसाठी स्ट्राइकवर होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर वरूण चक्रवर्तीने गुगली चेंडू टाकला होता. ज्यावर शिमरोन हेटमायरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, हा प्रयत्न फसला आणि चेंडू लाँग ऑनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या शुबमन गिलच्या हातात गेला होता.
शुबमन गिलनेही कुठलीही चूक न करता अविश्वसनीय झेल टिपला होता. परंतु, या झेलचा मोबदला शुबमन गिलला मिळाला नाही. कारण तिसऱ्या पंचांनी तो चेंडू ‘नो बॉल’ घोषित केला होता.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा रोमांचक विजय
या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयासाठी १३६ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यरने सर्वाधिक ५५ धावांची खेळी केली होती. तर, शुबमन गिलने ४६ धावांचे योगदान दिले होते.
शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती. या षटकात आर अश्विनने पहिल्या ४ चेंडूवर २ गडी बाद करत १ धाव खर्च केली होती. त्यावेळी कोलकाताला शेवटच्या २ चेंडूंमध्ये ६ धावांची आवश्यकता असताना राहुल त्रिपाठीने षटकार मारून विजय मिळवून दिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: युवराजचे ६ सिक्स ते ऐतिहासिक विजय; टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील ४ अविस्मरणीय क्षण
धवनची पुन्हा कासवगती खेळी; कारकीर्दीत इतक्यांदा ओढवलीय नामुष्की




