भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याने जानेवारी महिन्यात संघासाठी जबरदस्त प्रदर्शन केले. या प्रदर्शनासाठी त्याला सोमवारी (13 फेब्रुवारी) आयसीसीकडून बक्षीस मिळाले. शुबमन गिलला जानेवारी महिन्यातील प्रदर्शनासाठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. तर दुसरीकडे महिला क्रिकेटमधून इंग्लंडच्या 19 वर्षाखालील महिला संघाची कर्णधार ग्रेस स्क्रीवन्स (Grace Scrivens ) या पुरस्काराची मानकरी ठरली.
शुबमन गिल याने जानेवारी महिन्यात भारतासाठी श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत जबरदस्त खेळी करत धावांचा पाऊस पाडला. 23 वर्षीय शुबमन गिल (Shubman Gill) याने जानेवारी महिन्यात 100 पेक्षा मोठी धावसंख्या तीन वेळा केली आणि एकूण 567 धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात त्याने द्विशतक देखील ठोकले. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात 149 चेंडूत 28 चौकारांच्या मदतीने 208 धावा केल्या. या खेळीनंतर शुबमन वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक खरणारा सर्वात युवा खेळाडू ठरला.
त्यव्यतिरित्क श्रीलंका संघाविरुद्ध शुबमनच्या बॅटमधून 116 आणि न्यूझीलंडविरुद्धच्या एका सामन्यात 112 धावा निघाल्या होत्या. आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी शुबमन गिलसमोर न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डेवॉन कॉनवे आणि मोहम्मद सिराज यांचे आव्हान होते. सिराजने या दोघांना मात देऊन हा मानाचा पुरस्कार पटकावला. ऑक्टोबर 2022 मध्ये विराट कोहलीने हा पुरस्कार जिंकला होता. विराटने शुबमन हा पुरस्कार जिंकणारा पहिलाच भारतीय ठरला.
दुसरीकडे ग्रेस स्क्रीवन्स हिने मागच्या महिन्यात पार पडलेल्या 19 वर्षांखाली महिला टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. इंग्लंड संघाचे नेतृत्व करताना ग्रेसने तिच्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवले. अंतिम सामन्यात मात्र भारतीय संघाने ग्रेसच्या संघाला मात दिली आणि विश्वचषक जिंकला. ग्रेसने या एका महिन्यातच्या कालावधीत रवांडा, आयरलँड, वेस्ट इंडीज या संघांविरुद्ध तीन लागोपाठ अर्धशतके ठोकले. यादरम्यान तिने 41.85 च्या सरासरीने 293 धावा कुटल्या. तिने गोलंदाजीतही कामाल दाखवत 7.11 च्या स्ट्राईक रेटने 9 विकेट्स घेतल्या. ग्रेने या पुरस्काराच्या शर्यतीत ऑस्ट्रेलियाच्या फोएबे फिचफिल्ड आणि बेथ मुनी यांना पछाडले. (Shubman Gill was named as ICC Player of the Month for the month of January)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
घातक वेगवान गोलंदाज संघात घेण्यासाठी मुंबईने खर्च केले 1.90 कोटी, जाणून घ्या तिच्याबद्दल
टी20 स्पेशालिस्ट रिचा घोषवर पडला पैशाचा पाऊस, ’इतके’ कोटी घेत झाली आरसीबीयन