बुधवारी (दि. 1 फेब्रुवारी) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा आणि निर्णायक टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडवर 168 धावांनी दमदार विजय मिळवला. हा आतापर्यंतचा टी20तील भारतीय संघाने मिळवलेला सर्वात मोठा विजय होता. या विजयासह भारताने मालिकाही 2-1ने खिशात घातली. विशेष म्हणजे, या विजयात सिंहाचा वाटा उचलण्याचे काम युवा भारतीय फलंदाज शुबमन गिल याने केले. यासोबतच गिलच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो या विक्रमात अव्वल भारतीय बनला आहे.
शुबमन गिलचा विक्रम
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Captain Hardik Pandya) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताकडून शुबमन गिल (Shubman Gill) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांनी डावाची सुरुवात केली होती. यावेळी किशन अवघ्या 1 धावेवर तंबूत परतला. मात्र, गिल शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहिला आणि संघासाठी मोठी धावसंख्या उभारली. यावेळी गिलने अवघ्या 63 चेंडूत नाबाद 126 धावा कुटल्या. या धावा करताना त्याने 7 षटकार आणि 12 चौकारांचाही पाऊस पाडला. यासह गिलने विक्रमही नावावर केला.
WHAT. A. KNOCK 🔥
A maiden T20I century for Shubman Gill 👏#INDvNZ | 📝: Scorecard: https://t.co/CR0CCRQdoZ pic.twitter.com/2etTJZKiUj
— ICC (@ICC) February 1, 2023
शतक ठोकताच गिल भारतीय संघाकडून सर्व क्रिकेटप्रकारात शतक झळकावणारा युवा फलंदाज बनला. गिलने अवघ्या 23 वर्षे आणि 146 दिवसांच्या वयात भारताकडून सर्व क्रिकेट प्रकारात शतक ठोकण्याची कामगिरी करून दाखवली. त्याची ही कामगिरी कौतुकास्पद ठरली. भारताकडून सर्व क्रिकेट प्रकारात शतक करणारा यादीतील दुसरा युवा फलंदाज इतर कुणी नसून सुरेश रैना (Suresh Raina) आहे. रैनाने 23 वर्षे आणि 241 दिवसांच्या वयात भारताकडून सर्व क्रिकेट प्रकारात शतक ठोकले होते.
कमी वयात भारताकडून सर्व क्रिकेट प्रकारात शतक करणारे खेळाडू
23 वर्षे आणि 146 दिवस- शुबमन गिल*
23 वर्षे आणि 241 दिवस- सुरेश रैना
भारताने असा मिळवला विजय
शुबमन गिलच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात 4 विकेट्सच्या मोबदल्यात सर्व 20 षटके खेळून 234 धावा कुटल्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या नाकी नऊ आल्या. न्यूझीलंडकडून फक्त डॅरिल मिचेल (35 धावा) आणि कर्णधार मिचेल सँटनर (13 धावा) यांनाच दोन आकडी धावसंख्या करता आली. त्यांच्याव्यतिरिक्त एकही फलंदाज 10 धावांपर्यंतही पोहोचू शकला नाही. भारताकडून गोलंदाजी करताना कर्णधार हार्दिक पंड्या याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स आपल्या खात्यात जोडल्या. (Shubman Gill Youngest Indian to Score Century in all formats)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मन कसं जिंकायचं हे पंड्याने दिलं दाखवून! मालिका खिशात घालताच संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूकडे सोपवली ट्रॉफी
जम्मू- काश्मीर एक्सप्रेस सुसाट! चेंडूचा वेगच इतका की, थर्टी यार्ड सर्कलच्या बाहेर जाऊन पडल्या बेल्स