---Advertisement---

प्रो कबड्डी २०१९ मध्ये एकाच संघाकडून खेळणार देसाई बंधू!

On: मंगळवार, एप्रिल 9, 2019 4:12 PM
---Advertisement---

प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमाचा लिलाव सध्या मुंबईमध्ये सुरु आहे.  या लिलावाला कालपासून(8 एप्रिल) सुरुवात झाली आहे. या लिलावाची आज(9 एप्रिल) सांगता होणार आहे. या लिलावात आत्तापर्यंत सिद्धार्थ देसाई सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.  त्याला काल तेलुगू टायटन्सने 1 कोटी 45 लाखांची बोली लावत संघात घेतले आहे.

तर आज त्याचा भाऊ सुरज देसाईला दुसऱ्या फेरीत तेलुगू टायटन्सनेच 10 लाखांची बोली लावत संघात घेतले आहे. त्यामुळे आता सुरज आणि सिद्धार्थ हे देसाई बंधू प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमात एकाच संघाकडून एकत्र खेळताना दिसणार आहेत.

या लिलावात सुरजवर पहिल्या फेरीत कोणीही बोली लावली नव्हती. पण त्यानंतर झालेल्या दुसऱ्या फेरीत मात्र तेलगू टायटन्सने त्याला संघात सामील करुन घेतले.

सुरजला याआधी प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात जयपूर पिंक पँथर्सने घेतले होते. पण तो त्यावेळी सेनादलमध्ये असल्याने त्याला खेळता आले नव्हते. तसेच त्याला नंतर दबंग दिल्लीनेही संघात घेतले होते. परंतू त्याला दुखापत झाल्याने तो एकही सामना खेळला नव्हता.

त्यामुळे दोनदा प्रो कबड्डीमध्ये खेळण्याची संधी मिळूनही खेळता न आलेला सुरज आता 7 व्या मोसमात कशी कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

तसेच यावर्षी सर्वात महागडा ठरलेला सिद्धार्थने मागीलवर्षी प्रो कबड्डीमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणातच त्याने दमदार खेळ करत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले.

त्याने मागीलवर्षी प्रो कबड्डीच्या 6 व्या मोसमात रेडींग आणि टॅकल पॉईंट मिळून 221 पॉइंट मिळवले होते. यातील 218 पॉइंट्स त्याने रेडींगमध्ये मिळवले होते. तो 6 व्या मोसमात सर्वाधिक रेडींग पॉइंट मिळवणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला होता.

आता हे दोन देसाई बंधू यावर्षी एकत्र खेळताना काय कमाल करणार याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

महत्त्वाच्या बातम्या – 

प्रो कबड्डी लिलावात सलग दुसऱ्यांदा हा खेळाडू झाला करोडपती

हरभजननने सांगितला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समधील हा मोठा फरक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment