---Advertisement---

प्रो कबड्डी लिलाव: ‘बाहुबली’ सिद्धार्थ देसाई झाला करोडपती; तेलगु टायटन्सने ‘इतक्या’ कोटींमध्ये केले कायम

On: सोमवार, ऑगस्ट 30, 2021 8:34 PM
---Advertisement---

प्रो कबड्डीच्या ८ व्या हंगामाला येत्या डिसेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी २९, ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव आयोजिक करण्यात आला आहे. यंदा लिलावाची पद्धत बदलण्यात आली असून खेळाडूंचे वेगवेगळ्या विभागात वर्गीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, या लिलावात स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाईला तब्बल १ कोटी ३० लाख इतकी किंमत मिळाली आहे.

सिद्धार्थला तेलगु टायटन्सने संघात कायम केले आहे. त्याला संघात घेण्यासाठी युपी योद्धा आणि पटना पायरेट्समध्ये चढाओढ सुरु होती. अखेर युपी योद्धाने १ कोटी ३० लाखांच्या किंमतीत बोली जिंकली. मात्र, त्याचवेळी तेलगु टायटन्सने फार विचार न करता एफबीएम कार्डचा वापर केला आणि सिद्धार्थला १ कोटी ३० लाखांच्या किंमतीत आपल्या संघात कायम केले.

सिद्धार्थने मागील हंगामात तेलगुकडून चांगला खेळ केला होता. त्याने मागील हंगामात एकूण २२० पॉइंट्स मिळवले होते. त्यातील २१७ पॉइंट्स त्याने चढाई करताना मिळवले होते. तो सर्वाधिक रेड पॉइंट्स मिळवणाऱ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर होता. त्याआधी सहाव्या हंगामातून त्याने प्रो कबड्डीमध्ये पदार्पण केले होते.

त्याने पदार्पणाच्या हंगामात रेडींग आणि टॅकल पॉईंट मिळून २२१ पॉइंट मिळवले होते. यातील २१८ पॉइंट्स त्याने रेडींगमध्ये मिळवले होते. तो ६ व्या मोसमात सर्वाधिक रेडींग पॉइंट मिळवणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला होता.

सोमवारी (३० ऑगस्ट) परदेशी खेळाडूंचे, तसेच भारताच्या अ गटातील खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये भारताच्या अ लिलावाच्या गटात चढाईपटूंच्या (रेडर्स) यादीत सिद्धार्थचा समावेश होता. त्याची मुळ किंमत ३० लाख होती.

महत्त्वाच्या बातम्या –

चौथ्या कसोटीपूर्वी भारताला टेंशन! विराट, अजिंक्य, पुजारा यांचे ओव्हलवरील आकडे चिंता वाढवणारे

आरसीबी संघासाठी वाईट बातमी! ‘या’ अष्टपैलू खेळाडूने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून घेतली माघार

सुमीत अंटीलची सुवर्णमय कामगिरी! विश्वविक्रमासह भारताला मिळवून दिले दुसरे ‘सुवर्णपदक’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---