---Advertisement---

१९ वर्षांखालील विश्वचषक खेळण्याआधीच टीम इंडियाला बसला मोठा धक्का

On: शनिवार, जानेवारी 11, 2020 7:54 PM
---Advertisement---

भारताचा अष्टपैलू खेळाडू दिव्यांश जोशी खांद्याच्या दुखापतीमुळे 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दिव्यांशला 19 वर्षांखालील चौरंगी वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली होती.

दिव्यांशच्या जागी आता 19 वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघात सिद्धेश वीरला स्थान देण्यात आले आहे. सिद्धेश अष्टपैलू खेळाडू आहे. तो महाराष्ट्राकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.

सिद्धेशने नुकत्याच पार पडलेल्या चौरंगी वनडे मालिकेतील अंतिम सामन्यात 19 वर्षांखालील दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध चांगली फलंदाजी केली. त्याने भारतीय डावाच्या शेवटच्या काही षटकात 37 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 259 धावा केल्या.

या चौरंगी वनडे मालिकेत भारत, दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि न्यूझीलंड या चार देशांचे 19 वर्षाखालील संघ सामील होते. या मालिकेत खेळल्या गेलेल्या तिन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.

आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 19 वर्षाखालील विश्वचषकात खेळणार आहे. या विश्वचषकातील भारताचा पहिला सामना 19 जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध होईल. या विश्वचषकाचा अंतिम सामना 9 फेब्रुवारीला होणार आहे. 

19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धासाठी भारतीय संघ

प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव जुरेल , यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, सिद्धेश वीर, शुभंग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंग, कार्तिक त्यागी, अथर्व आंकोलेकर, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), सुशांत मिश्रा, विद्याधर पाटील.

https://twitter.com/Maha_Sports/status/1216001415547502594

https://twitter.com/Maha_Sports/status/1215993618000822272

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---