पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. एक तर दोन वेळेचा विश्वविजेता वेस्ट इंडिज स्पर्धेबाहेर झाला, तर सुरूवातीला 2014चा विजेता संघ श्रीलंकाही बाहेर पडणार असे चित्र निर्माण झाले होते. गुरूवारी (27 ऑक्टोबर) पर्थ येथे झालेल्या सुपर 12च्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला एका धावेने पराभूत केले. या सामन्याचा नायक ठरला सिकंदर रझा. त्याने 3 महत्वाच्या विकेट्स घेत सामनावीर पुरस्कार मिळवला आणि याचबरोबर भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहली याचा विक्रम मोडला.
झिम्बाब्वेचा संघ पहिल्यांदाच टी20 विश्वचषकाच्या सुपर 12मध्ये खेळत आहे. त्यामधील 24व्या सामन्यात झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा (Sikandar Raza) याने 4 षटकात 25 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याने शान मसूद (44), शादाब खान (17) आणि हैदर अली (0) यांना बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर घोषित केले गेले. त्याचा हा चालू वर्षातील आंतरराष्ट्रीय टी20मधील सातवा सामनावीर पुरस्कार आहे. जो एक विक्रम ठरला आहे.
विराट कोहली 2016मध्ये सहावेळा ठरला मॅन ऑफ द मॅच
भारताचा अनुभवी फलंदाजी विराट कोहली (Virat Kohli) याने 2016मध्ये आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकले. त्याने सहा सामनावीर पुरस्कार जिंकत पहिले स्थान काबीज केले होते. आता त्या जागी रझा आला आहे. तसेच या यादीत भारताचाच सूर्यकुमार यादव यावर्षी 5 सामनावीर पुरस्कार जिंकत तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसन यांनीही एकाच वर्षात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पाच सामनावीर पुरस्कार जिंकण्याची कामगिरी केली आहे. Most Man of the Match in T20I in 2022
If not with the bat, he will get you with the ball 💥
Sikandar Raza turned the tide of the game with his brilliant spell and is the @aramco POTM ⭐ pic.twitter.com/mMPKj369Zi
— ICC (@ICC) October 27, 2022
एकाच टी20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच
टी20 विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याच्या यादीत रझा दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात आतापर्यंत तीन सामनावीर पुरस्कार पटकावले आहे. या यादीत वॉटसन पहिल्या स्थानावर आहे. तो 2012च्या हंगामात चार वेळा सामनावीर ठरला. Most Man of the Match in a single T20 World Cup
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा’ अजब नियम तुम्हाला माहिती होता का?, दक्षिण आफ्रिकी संघाला मिळाल्या फुकटच्या पाच धावा
‘याच्यापेक्षा बॉटल ओपनर बरा!’, सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरलेला केएल राहुल होतोय ट्रोल