---Advertisement---

‘विराट कोहली टायगर वुड्स सारखा आहे’, सलग २ शतके झळकावणाऱ्या झिम्बाब्वेच्या खेळाडूने केले कौतुक

On: रविवार, ऑगस्ट 14, 2022 5:36 PM
Virat-Kohli
---Advertisement---

गेल्या काही काळापासून विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. जवळपास ३ वर्षे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावता आले नाही. त्यावरून अनेक दिग्गज आणि क्रिकेट जाणकार विराटला ट्रोल करत आहेत. मात्र, झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू सिकंदर रझाने विराटबद्दल अभिमानास्पद विधान केलं आहे.

अनिस साजनसोबत यूट्यूब चॅनलवर बोलताना सिकंदर रझा म्हणाला की, “विराट भाई सर्व फॉरमॅटचा खेळाडू आहे. मी त्याला टायगर वूड्स आणि मुहम्मद अली सारखा मानतो. या लोकांनी आपल्या खेळात क्रांती घडवली आहे. त्याने इतर लोकांचा विचार करून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला, जो नंतर सर्वांनी स्वीकारला.”

मी त्यांना काय सल्ला देऊ
सिकंदर रझा पुढे म्हणाले की, “क्रिकेट नेहमीच फिटनेसबद्दल असते. पण विराटने ज्या पद्धतीने खेळाचा तो भाग (फिटनेस) युवा पिढीसाठी पुढे नेला. तो प्रशंसनीय आहे आणि लोकांनी त्याला त्याचे पुरेसे श्रेय दिले पाहिजे.” सिकंदरला जेव्हा विचारण्यात आले की तो फॉर्मात नसलेल्या कोहलीला काय सल्ला देईल, तेव्हा तो म्हणाला की, “मला वाटत नाही की, करिअरमध्ये १६-२० हजार धावा करणाऱ्या व्यक्तीला सल्ला देण्याइतका मी अनुभवी आहे. मी त्यांना काही सांगू शकत नाही.”

“विराट कोहलीच्या खेळाबद्दल लोकांनी गप्प बसावे आणि त्याला एकटे सोडावे”, असेही सिकंदर रझा म्हणाला. तो पुन्हा त्याच्या शिखरावर पोहोचेल. यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाबाबत तो म्हणाला की, “भारत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे टी-२० विश्वचषक स्पर्धेचे प्रबळ दावेदार आहेत.”

दरम्यान, टीम इंडिया ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेला पोहोचली आहे. ही मालिका १८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र या मालिकेतून कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्या तुलनेवर झिम्बाब्वेचा स्टार क्रिकेटर सिकंदर रझाने मोठी गोष्ट सांगितली आहे. रझाने बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सलग २ सामन्यात २ शतके झळकावली होती. रझाने बांग्लादेश विरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 135 धावा करून संघाला विजय मिळवून दिला होता, अशी माहिती आहे. दुसऱ्या वनडेतही त्याने नाबाद ११७ धावा केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

‘जडेजाचा काही उपयोग नाही’ माजी दिग्गजाने टी-२० विश्वचषकाविषयी केलीये भविष्यवाणी

‘आमच्याकडे हार्दिक पांड्या असता तर…’, पाकिस्तानच्या दिग्गजाने केली खंत व्यक्त

‘वाघ खूप आहेत, पण द्रविड एकच!’ आत्मचरित्रात रॉस टेलरने सांगितला भन्नाट किस्सा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---