इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मध्ये पाच वेळेस विजेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्स संघ १४ व्या हंगामात संघर्ष करताना दिसतोय. स्पर्धेच्या उत्तरार्धात संघाला सलग ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेला. त्यानंतर, पंजाब विरुद्ध त्यांनी एकमात्र विजय मिळवला. त्याचवेळी, मुंबईसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली. संघाचा युवा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर उर्वरित स्पर्धेतून बाहेर झाला असून, त्याच्या जागी सिमरजीत सिंग याची संघात निवड केली गेली आहे.
अर्जुन आऊट, सिमरजीत इन
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२१ लिलावातून आपल्या संघात सहभागी करून घेतलेला मुंबईचा युवा अष्टपैलू अर्जुन तेंडुलकर दुखापतग्रस्त झाल्याने आयपीएलच्या उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्सने ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्याचवेळी त्याच्या जागी दिल्लीचा तेवीस वर्षीय उजव्या हाताचा युवा वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंग याची निवड केली.
🚨 Squad Update 🚨
Right-arm medium pacer Simarjeet Singh will be replacing Arjun Tendulkar for the remainder of #IPL2021
📰 Read all the details 👇#OneFamily #MumbaiIndians https://t.co/AcfBJsYf2w
— Mumbai Indians (@mipaltan) September 29, 2021
अशी राहिली आहे कारकीर्द
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करणारा सिमरजीत उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत १० प्रथमश्रेणी सामने खेळताना ३७ बळी आपल्या नावे केले आहेत. तसेच, १५ टी२० सामन्यात १८ बळी त्याच्या नावावर जमा आहेत. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झाली होती.
सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे अर्जुन
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने या वर्षाच्या सुरुवातीला खेळाडूंच्या लिलावात त्याच्या २० लाखांच्या मूळ किमतीला खरेदी केले होते. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत मुंबईसाठी दोन टी२० सामने खेळले आहेत. आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेत मुंबई इंडियन्स सध्या पाचव्या क्रमांकावर आहे आणि ११ सामन्यांत पाच विजयांसह १० गुण कमावले आहेत. यूएईच्या लेगमध्ये मुंबई इंडियन्स संघाला शेवटच्या चार सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकता आला आहे. मुंबईने मंगळवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्सचा सहा गडी राखून पराभव केला. संघाचा पुढील सामना शनिवारी दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतीय महिला ऐतिहासिक ‘पिंक बॉल टेस्ट’साठी सज्ज, दीड दशकानंतर खेळणार ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी
रोहितने २००७ सालची आठवण काढत आगमी टी२० विश्वचषकासाठी फुंकले रणशिंग, वाचा काय म्हणाला