भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-20 सामना गुरुवारी (12 जानेवारी) मोहालीमध्ये पार पडला. उभय संघांतील या सामन्यात शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यातील गोंधल सर्वांनी पाहिला. शुबमन गिलमुळे रोहितला शुन्यावर विकेट गमवावी लागली. याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू सायमन डूल याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारताने 6 विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली.
रोहित शर्मा (Rohit Sharma) तब्बल 14 महिन्यांनंतर पहिल्यांदा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळत होता. मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध कर्णधार मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. पण रोहित अवघे दोन चेंडू खेळून शुन्यावर धावबाद झाला. शुबमन गिल याने नॉन स्ट्रेईक एंड न सोडल्यामुळे त्याला विकेट गमवावी लागली. दोघांमधील ताळमेळ गमावल्यामुळे भारताची धावसंख्या 1 असताना संघाला रोहितच्या रुपात पहिला झटका बसला. अनेकांनी या विकेटसाठी शुबमन गिलला जबाबदार ठरवले. भारतीय संघ फलंदाजी करताना सायमन डूल (Simon Doull) समालोचन करत होते.
समालोचनादरम्यान न्यूझीलंडचा हा माजी दिग्गज म्हणाला, “जेव्हा तुम्ही भागीदारी करत असता, तेव्हा सर्वकाही विश्वासावर अवलंबून असते. जोपर्यंत दुसरा कोणी तुमचा विश्वास सोडत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. शुबमन गिलने रोहितवर विश्वास दाखवला पाहिजे होता. चेंडुकडे न पाहता तो धावू शकत होता. रोहित क्रीजवर पोहोचला होता, पण गिल धावलाच नाही. रोहित त्याच्या जागी अगदी योग्य होता.”
दरम्यान, सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला शुबमन गिलविषयी प्रश्न विचारला गेला. यावर रोहितने विजय सर्वात महत्वाचा असून मैदानात अशा गोष्टी होत राहतात, असे उत्तर दिले. रोहितची ही प्रतिक्रिया लाखो चाहत्यांची मने जिंकणारी ठरली. उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताला विजयासाठी 159 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे संघाने 17.3 षठकांमध्ये आणि 4 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. (Simon Doull on Rohit Sharma’s run out due to Shabuman Gill)
महत्वाच्या बातम्या –
नुसता धुराळा! क्रिकेटचा सामना खेळायला डेविड वॉर्नर थेट हेलिकॉप्टरने स्टेडियममध्ये
‘तरुणांकडून संधी हिसकावल्याची चर्चा आहे पण..’, रोहित-विराटच्या टी20 कमबॅकवर डिव्हिलियर्स काय म्हणाला पाहा