---Advertisement---

“त्याचे चेंडू म्हणजे बंदुकीच्या गोळ्या”; ‘उस्मानाबाद एक्सप्रेस’ राजवर्धनचा फॅन बनला किवी दिग्गज

On: रविवार, जानेवारी 16, 2022 8:36 PM
rajwardhan-hangargekar
---Advertisement---

वेस्ट इंडीज येथे शनिवारपासून (१५ जानेवारी) १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट विश्वचषकाला (U19 Cricket World Cup 2022) सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान होते. यश धूलच्या नेतृत्वातील (Captain Yash Dhull) भारतीय संघाने या सामन्यात ४५ धावांनी विजय मिळवत विजयी सलामी दिली. या सामन्यात भारतीय संघाने कमी धावसंख्येचे बचाव केला. त्याचवेळी, भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करत असलेल्या महाराष्ट्राच्या राजवर्धन हंगारगेकर (Rajwardhan Hangargekar ( याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. न्यूझीलंड संघाचा माजी क्रिकेटपटू व प्रसिद्ध समालोचक सायमन डूल (Simon Doull) हे त्याच्या गोलंदाजीने कमालीचे प्रभावीत झाले आहेत. त्यांनी त्याचे खास शब्दात कौतुक केले.

राजवर्धनच्या वेगाने प्रभावित झाले डूल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून राजवर्धन हंगारगेकरने जबाबदारी सांभाळली. त्याने या सामन्यात ८ षटकांमध्ये एक बळी मिळविला. मात्र, त्यांनी सातत्याने १४५ किमी प्रति तास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याचा हा वेग पाहून समालोचन करत असलेले सायमन डूल अत्यंत प्रभावित झाले. राजवर्धन चे कौतुक करताना ते म्हणाले,
“राजवर्धनची गोलंदाजी म्हणजे अक्षरशः बंदुकीची गोळी वाटत आहे.”
या सामन्याचे समालोचन करणारे सर्वच समालोचक सातत्याने त्याच्या गोलंदाजीचे कौतुक करत होते.

आशिया चषकात आला सर्वांच्या नजरेत
मागील महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या आशिया चषकात (U19 Asia Cup) आपल्या अष्टपैलू खेळाने राजवर्धन प्रसिद्धीझोतात आला होता. आक्रमक फटकेबाजी व वेगवान गोलंदाजी करण्यासाठी राजवर्धन सक्षम आहे. महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेला राजवर्धन देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. त्याने याच वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी व विजय हजारे ट्रॉफीमधून वरिष्ठ पातळीवर पदार्पण केले होते.

भारतीय संघाची विजयी सलामी
स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला ४५ धावांनी पराभूत केले. कर्णधार यश धूलच्या ८२ धावांच्या खेळीच्या जोरावर २३२ धावा करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला होता. त्यानंतर, विकी ओत्सवालच्या पाच बळींच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा डाव १८७ धावांवर गुंडाळला.

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंका दौऱ्यात ‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणे, पुजाराची सुट्टी निश्चित! ‘हे’ तरुण शिलेदार घेऊ शकतात जागा (mahasports.in)

धोनीसोबतचा प्रसंग आणि इतरही आठवणींना उजाळा, अनुष्काकडून ‘कर्णधार’ विराटचे अभिनंदन; ‘My Love…’ (mahasports.in)

Ashes Trophy| कांगारूंकडून साहेबांना शिकस्त! होबार्ट कसोटीसह ऍशेसवर ४-० ने कब्जा (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---