Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्रीलंका दौऱ्यात ‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणे, पुजाराची सुट्टी निश्चित! ‘हे’ तरुण शिलेदार घेऊ शकतात जागा

श्रीलंका दौऱ्यात 'आऊट ऑफ फॉर्म' रहाणे, पुजाराची सुट्टी निश्चित! 'हे' तरुण शिलेदार घेऊ शकतात जागा

January 16, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
Virat-Kohli-Cheteshwar-Pujara-Ajinkya-Rahane

Photo Courtesy: Twitter/ICC


भारताच्या कसोटी संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) अयशस्वी ठरल्यानंतर संघामध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांची जागा धोक्यात आली असून त्यांच्या जागी तरुण फलंदाजांना संधी दिली जाणार आहे. भारत श्रीलंकेविरुद्धच्या (India Vs Sri Lanka) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान रहाणे, पुजारा ऐवजी शुभमन गिल (Shubman Gill) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari) यांना संधी देऊ शकतो. ही मालिका २५ फेब्रुवारीपासुन बॅंगलोरमध्ये सुरु होणार असून त्यामध्ये रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे.

शुभमन गिल भारतीय संघाकडून बहुतांशी सलामीवीर म्हणून खेळला आहे. त्याने एकदा दुखापतीतुन बरा होऊन स्वत:ला उपलब्ध केलं, तर संघ व्यवस्थापक आणि निवडकर्ते त्याला विशेषज्ञ फलंदाज म्हणुन निवडु शकतात अशी अपेक्षा आहे.

व्हिडिओ पाहा- कर्णधार पद, रोहित, बीसीसीआय अन् बरंच काही… बोलतोय ‘किंग कोहली’

पुजारा आणि रहाणेला भारतीय संघातून वगळले जाणार हे जवळजवळ निश्चीतच झाले आहे. परंतु प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी निवड समितीला या दोन फलंदाजांना शेवटची संधी देण्यास सांगितले तरच हे दोन खेळाडू त्यांची स्थाने वाचवू शकतात. पण तसे झाले तर दावेदार तरुणांची नक्कीच निराशा होईल, ज्यांना त्यांच्या कारकिर्दीत योग्यवेळी संधी न मिळाल्यामुळे हताशा वाटू शकते.

याबाबत भारत दक्षिण आफ्रिका मालिकेमध्ये समालोचन करताना सुनिल गावस्कर म्हणाले की, “मला वाटतं पुजारा आणि रहाणेला श्रीलंका मालिकेसाठी संघातून वगळण्यात येईल. श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी हे दोघे खेळतील. तिसर्‍या स्थानावर हनुमा विहारी पुजाराची जागा घेऊ शकतो, तर पाचव्या क्रमांकावर रहाणेची जागा श्रेयस अय्यर घेऊ शकतो का? हे पाहावे लागणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दोन जागा निश्चितपणे रिक्त राहतील, असे मला वाटते.”

भारतीय संघाला आता अशा फलंदाजांची गरज असेल, जे मुक्तपणे फलंदाजी करू शकतील आणि एका सत्रात खूप धावा करू शकतील. कौशल्य, तंत्र आणि आवड यांचा विचार केला तर गिल यामध्ये चांगला आहे. जर गिल पाचव्या क्रमांकावर खेळला तर तो चेंडू जुना झाल्यावर परिस्थितीचा फायदा घेऊ शकतो.

परंतु श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांच्यात मधल्या फळीतील दुसऱ्या स्थानासाठीची निवड थोडी अवघड असेल. विहारी हा एक रक्षात्मक खेळाडू आहे, जो संयमी फलंदाजीसह कसोटी क्रिकेटला आवश्यक असलेली तांत्रिक क्षमता प्रदान करतो. पुजाराच्या तिसऱ्या स्थानासाठी तो चांगला पर्याय बनला आहे. पण सकारात्मक विचार केला, तर अय्यर हा अधिक चांगला आहे.

हेही वाचा- धोनीसोबतचा प्रसंग आणि इतरही आठवणींना उजाळा, अनुष्काकडून ‘कर्णधार’ विराटचे अभिनंदन; ‘My Love…’

रहाणे-पुजाराला सरावासाठी मिळेल वेळ
पुजारा आणि रहाणे दोघेही 33 वर्षांचे आहेत आणि कदाचित दोघांनाही फलंदाजीतील आपली चूक शोधावी लागणार आहे. राष्ट्रीय संघातून विश्रांती घेतल्याने त्यांना त्याच्या त्रुटींमधून सावरण्यासाठी आणि मजबूत पुनरागमन करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल.

रणजी ट्रॉफी पुन्हा पुढे ढकलली गेली नसती त्यांना त्यांच्या चुका सुधारण्याची चांगली सामना सराव संधी मिळू शकली असती. कारण सामन्यादरम्यान चूका सुधारणे हा नेहमीच चांगला पर्याय असतो. जर असे झाले नाही तर, ते इंग्लिश काउंटीमध्ये खेळू शकतात. जरी या दोघांनाही सुरुवातीच्या टप्प्यात काऊंटीमध्ये खेळून फारसा उपयोग झाला नसला, तरी ते फॉर्ममध्ये परतण्यासाठी येथे सराव करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीसोबतचा प्रसंग आणि इतरही आठवणींना उजाळा, अनुष्काकडून ‘कर्णधार’ विराटचे अभिनंदन; ‘My Love…’

फक्त कर्णधार विराटच्या जिद्दीमुळे भारतीय संघाचे ‘स्वप्न ते स्वप्नच’ राहिले, माजी क्रिकेटरने साधला निशाणा

धोनीच्या तोंडून निघालेले बोल उतरले सत्यात, विराटच्या राजीनाम्यानंतर खरी ठरली ‘ती’ भविष्यवाणी

हेही पाहा-


Next Post
ashes-2022

Ashes Trophy| कांगारूंकडून साहेबांना शिकस्त! होबार्ट कसोटीसह ऍशेसवर ४-० ने कब्जा

virat-kohli

'कर्णधारपदावर कोणाचा जन्मसिद्ध अधिकार नाही'

football

जमशेदपूर-हैदराबादमध्ये अव्वल स्थानासाठी चुरस

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143