Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘संघाची निवड माझे काम नाही’, कर्णधार कोहलीचे पुजारा-रहाणेच्या भविष्याच्या प्रश्नावर चोख प्रत्युत्तर

'संघाची निवड माझे काम नाही', कर्णधार कोहलीचे पुजारा-रहाणेच्या भविष्याच्या प्रश्नावर चोख प्रत्युत्तर

January 15, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या, भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
Virat-Kohli-and-Ajinkya-Rahane

Photo Courtesy: Twitter/BCCI


भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असून शुक्रवारी  (१४ जानेवारी) या दौऱ्यातील ३ सामन्यांची कसोटी मालिका संपली. या मालिकेत यजमान दक्षिण आफ्रिका संघाने २-१ अशा फरकाने विजय मिळवला. भारताच्या या पराभवाला फलंदाजांना मोठ्या धावा करण्यात आलेले अपयश मोठे कारण ठरले आहे. त्यातही चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे अनुभवी फलंदाज सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता यावर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याने प्रतिक्रिया दिली आहे. 

शुक्रवारी केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर विराट पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता. यावेळी त्याला अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी विराटने चोख उत्तर देत हे निवडकर्त्यांचे काम आहे, असे सांगितले.

त्याने म्हटले की, ‘संघात कोणाला निवडले जावे आणि कोणाला नाही, याचे उत्तर मी देऊ शकत नाही. संघाची निवड करणे माझे काम नाही, ते निवड समितीचे काम आहे. पण, जोपर्यंत माझा प्रश्न आहे, मी पुजारा आणि रहाणेला पाठिंबा देत राहिल.’

अधिक वाचा – ‘हॅपी रिटायरमेंट’ म्हणत नेटकऱ्यांनी रहाणे-पुजाराला सोशल मीडियावर दिला निरोप, पाहा भन्नाट मिम्स

रहाणे आणि पुजाराची कामगिरी
रहाणे आणि पुजारा गेल्या काही महिन्यांपासून फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसत आहेत. पुजाराने नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ६ डावात २०.६६ च्या सरासरीने १२४ धावा केल्या. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. तसेच रहाणेने ६ डावात १ अर्धशतकासह २२.६६ च्या सरासरीने १३६ धावा केल्या. या दोघांनाही महत्त्वाच्या क्षणी मोठ्या धावा करण्यात अपयश आल्याने सध्या दोघांवरही मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?

भारताचा कसोटी मालिकेत पराभव 
भारताने दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात शानदार केली होती. कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने ११३ धावांनी विजय मिळवला होता. पण, नंतर दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन केले आणि दुसरा सामना ७ विकेट्सने जिंकून मालिकेत बरोबरी साधली. त्यानंतर तिसरा सामना देखील दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली.

महत्त्वाच्या बातम्या – Ajinkya Rahane, Cheteshwar Pujara, Virat Kohli, Team India, South Africa vs India

जोकोविचमागची साडेसाती संपेना! ऑस्ट्रेलियन सरकारने मेलबर्नमधून घेतलं ताब्यात

‘बुमराह जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज’, नेहमी भारतीय संघावर टीका करणाऱ्या माजी कर्णधारानेच थोपटली पाठ

‘हीच योग्य वेळ’, म्हणत एबी डिव्हिलियर्सने सांगितले निवृत्तीमागचे खरे कारण


Next Post
asia-cup-u19-ind

भारताचे 'यंगिस्तान' आजपासून सुरू करणार १९ वर्षांखालील विश्वचषकातील अभियान, जाणून घ्या वेळापत्रक

DRS Controversy

केपटाऊन कसोटीतील डीआरएसच्या वादानंतर भारतीय खेळाडूंवर होणार कारवाई? वाचा सविस्तर

Wasim-Jaffer-Micheal-Vaughan

भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर आमने-सामने आले जाफर आणि वॉन, पेटले ट्वीटरवॉर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143