पाकिस्तानात क्रिकेट खेळताना सर्वांना नेहमीच सुरक्षेची समस्या जाणवते. 2009 मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक वर्ष पाकिस्तानमधील क्रिकेट बंद होते. मागील काही वर्षापासून अनेक प्रमुख संघ पाकिस्तानात द्विपक्षीय मालिका खेळत आहेत. पाकिस्तानमध्ये त्यासोबतच पाकिस्तान सुपर लीगचे देखील आयोजन केले जातेय. असे असतानाच न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व समालोचक सायमन डूल यांनी पाकिस्तानविषयी एक धक्कादायक वक्तव्य केले आहे.
सायमन डूल हे सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगमध्ये समालोचन करताना दिसत आहेत. डूल हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी प्रसिद्ध असून, वरिष्ठ खेळाडूंवर देखील टीका करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत. पीएसएलमध्ये ते असेच स्पष्ट व परखड समालोचन करत असतात. त्याच मुद्द्यावरून त्यांना अनेकदा टिकेला देखील सामोरे जावे लागते. पाकिस्तानमध्ये आपल्याला कसा अनुभव आला याबाबत त्यांनी नुकताच खुलासा केला. ते म्हणाले,
“पाकिस्तानमध्ये समालोचन करत असताना मला तुरुंगात राहिल्याचा भास होत होता. मी हॉटेल रूममध्येच जास्त वेळ असायचो. बाहेर फिरायची मला भीती होती. कारण, बाबर आझम याचे चाहते मला लक्ष करणार होते. त्यामुळे मी नेहमीच दहशतीत असायचो.”
डूल यांनी नुकत्याच झालेल्या पीएसएल हंगामावेळी पाकिस्तानचा कर्णधार तसेच पीएसएलमध्ये पेशावर झाल्मी संघाचे नेतृत्व करणाऱ्या बाबर आझम याच्यावर टीका केली होती. बाबरने अधिक चेंडू घेत आपले शतक पूर्ण केलेले. त्यावेळी खालच्या क्रमांकावर अधिक आक्रमक फलंदाज शिल्लक होते. या टीकेवरून बाबरच्या चाहत्यांनी डूल यांना मारण्याची धमकी दिलेली. सध्या आयपीएलमध्ये त्यांनी विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर देखील बोट ठेवलेले.
(Simon Doull Said I Am So Scared Felling Jailed In Pakistan Due To Babar Azam Fans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुडघ्याच्या दुखापतीची झगडतोय धोनी, तर ‘हा’ वेगवान गोलंदाज दोन आठवड्यांसाठी बाहेर : स्टीफन फ्लेमिंग
कोट्यावधी धोनी प्रेमी जमले एकत्र! सीएसके-राजस्थान सामन्यात शेवटच्या चेंडूवर घमासान