यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेली आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात न्यूझीलंड संघाने २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या पराभवाचा बदला घेत इंग्लंड संघाला पराभूत केले. या सामन्यात न्यूझीलंड संघाचा विस्फोटक फलंदाज डॅरील मिशेलने अप्रतिम फलंदाजी केली होती. दरम्यान न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटूने या खेळीचे तोंडभरून कौतुक केले आहे.
न्यूझीलंड संघाचे माजी क्रिकेटपटू साईमन डूल यांनी समालोचन करताना म्हटले की, “महान फिनिशर एमएस धोनीने मला एकदा सांगितले होते की, तुम्ही जितकी जास्त वेळ फलंदाजी कराल, खेळ जितका खोल जाईल तितके विरोधी पक्ष आणि त्यांचे गोलंदाज अधिक चिंतित होतील. आज रात्री डॅरील मिशेलने देखील तसेच काही केले. त्याने पाहिलं की, न्यूझीलंड संघाचे २ फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहे. त्यानंतर ठरवलं की तो फलंदाजी करेल आणि संघाला अंतिम फेरीच्या जवळ घेऊन जाईल.”
https://twitter.com/MSDevoteee/status/1458492133791256577
आयसीसी टी२० विश्वचषक २०१९ स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. परंतु शेवटी इंग्लंड संघाने बाऊंड्री काऊंटच्या नियमामुळे बाजी मारली आणि विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता.
पण, २०२१ च्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात आता डॅरील मिशेलने ४७ चेंडूंमध्ये ७२ धावांची खेळी करत धोनी स्टाईलमध्ये न्यूझीलंड संघाला विजय मिळवून दिला.
या मोठ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना मोईन अलीने नाबाद ५१ धावांची तुफानी खेळी केली. तर डेविड मलानने ४१ आणि जोस बटलरने २९ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर इंग्लंड संघाला २० षटक अखेर ४ बाद १६६ धावा करण्यात यश आले होते.
१६७ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून डॅरील मिशेलने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर डेवोन कॉनवेने ४६ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. तसेच जिमी नीशमने ११ चेंडूत २७ धावांची ताबडतोड खेळी केली आणि हा सामना न्यूझीलंड जिंकले. न्यूझीलंड संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा जिगरी दोस्त अवेश खानने व्यंंकटेश अय्यरला दिली टीम इंडियात निवड झाल्याची बातमी, वाचा किस्सा
इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल जिंकल्यानंतर जिमी नीशम आपल्या खुर्चीवरून का हलला नाही? स्वत:च केला खुलासा
गावसकरही झाले बाबर आझमवर प्रभावित; म्हणाले, ‘…तर तो एक महान खेळाडू होईल’






