---Advertisement---

विराट आणि एबी स्वतःचं एक प्रशिक्षक आहेत; जाणून घ्या का असे म्हणाले आरसीबीचे कोच

On: बुधवार, एप्रिल 28, 2021 5:28 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासात जेतेपद मिळवण्यापासून वंचित राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यात त्यांना ५ सामने जिंकण्यात यश आले आहे. तसेच मंगळवारी (२७ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी १ धावाने विजय मिळवला होता. या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रशिक्षक साइमन कॅटिच यांनी संघातील मुख्य खेळाडूंबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

कॅटिचला जेव्हा विचारण्यात आले की, विराट कोहली आणि एबी डिविलियर्स या दोन खेळाडूंसोबत प्रशिक्षक म्हणून तुम्ही समन्वय कसा साधला आहे? यावर कॅटिच म्हणाले की, “कोहली आणि डिविलीयर्स स्वतःच एक प्रशिक्षक आहेत. दोघेही बरेच वर्ष अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत आणि खेळाच्या प्रत्येक टप्प्याबद्दल त्यांना चांगली माहिती आहे.”

तसेच विराट कोहलीबद्दल बोलताना ते म्हणाले की, “कोहली खेळाचे अनेक पैलू अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तो एक चांगला प्रोफेशनल खेळाडू आहे. तो जिम, फिटनेस, रीकव्हरी, न्यूट्रिशन पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही. विराट नेहमी विचारत असतो की, असे काय होऊ शकते की, तो त्याच्या खेळाचा दर्जा आणखी उंचावू शकतो.”

विराट कोहली गेले अनेक वर्ष रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करत आहे. परंतु त्याला एकदाही जेतेपद पटकावण्यास यश आले नाहीये. त्यामुळे अनेकदा त्याच्या नेतृत्वावर टीका देखील केली गेली होती.परंतु कॅटीचने विराट कोहलीच्या नेतृत्वाचे कौतुक करत म्हटले की, “एका कर्णधाराच्या दृष्टिकोनातून कोहली जिंकण्यासाठी आणि प्रतिस्पर्धा करण्यासाठी थांबला आहे. एका कर्णधाराच्या रूपात तुम्ही यापेक्षा जास्त अजून काय करता. तो उत्कृष्ट आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

“एबीला माझा सलाम, अजूनही वाटत नाही तो निवृत्त झाला आहे,” कोहलीने केली स्तुती

‘क्रिकेटरला संघातून दूर नेऊ शकता, पण त्याच्यातील चाहत्याला नाही’, अवेश खानच्या ‘त्या’ कृतीवर बेंगलोरची प्रतिक्रिया

‘कोणालाही पूर्ण पृथ्वीतलावर फक्त डिविलियर्सची फलंदाजी पाहायला आवडेल, कारण तो..’ महान फलंदाजाने केली स्तुती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---