मेलबर्न । अव्वल मानांकित सिमोना हॅलेपने ऑस्ट्रेलियन ओपन २०१८ची अंतिम फेरी गाठली आहे. तिने २१व्या मानांकित अँजेलिक कर्बरला अतीतटीच्या सामन्यात पराभूत केले.
हा सामना तब्बल २ तास २० मिनिटे चालला. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी एकदा मॅच पॉईंट वाचवला परंतु अखेर सिमोना हॅलेपला विजय मिळवण्यात यश आले. ६-३, ४-६, ९-७ असा झालेला हा सामना दोन्ही खेळाडूंचा कस पाहणारा ठरला.
सिमोना हॅलेपने तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली असून ऑस्ट्रेलियन ओपनची तिची ही पहिलीच अंतिम फेरी आहे. यापूर्वी तिने २०१४ आणि २०१७मध्ये रोलँड ग्रँरोस अर्थात फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली होती.
तिचा अंतिम फेरीचा सामना द्वितीय मानांकित कॅरोलिन वोझनीयाकीशी होणार आहे.
डेन्मार्कच्या वोझनीयाकीने बिगमानंकित एलिस मर्टन्सला ६-३, ७-६(७-२) उपांत्यफेरीत असे पराभूत केले आहे.
तिनेही कारकिर्दीत तिसऱ्यांदा ग्रँडस्लॅमची अंतिम फेरी गाठली असून तिने यापूर्वी २००९ आणि २०१४मध्ये अमेरिकन ओपनची अंतिम फेरी गाठली होती.
उपांत्यफेरी अँजेलिक कर्बरपराभूत झाल्यामुळे कॅरोलिन वोझनीयाकी जरी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली तरी तिला ब्लूटीए क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होता येणार नाही कारण आजच्या विजयाने सिमोना हॅलेपने अव्वल स्थान पक्के केले आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत अव्वल आणि द्वितीय मानांकित खेळाडू २०१५ साली पोहचले होते. तेव्हा अव्वल मानांकित सेरेना विलियम्स आणि द्वितीय मानांकित मारिया शारापोवा हे दोन खेळाडू पोहचल्या होत्या.
https://twitter.com/AustralianOpen/status/956434180551860226