टोकियो येथे सध्या सुरु असलेल्या ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारताच्या खात्यात स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रविवारी कांस्यपदकाची भर टाकली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिंधू सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
ऑलिम्पिकमधील भारताची सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक असलेली पीव्ही सिंधू कमाईच्या बाबतीतही अव्वल क्रमांकावर आहे. भारतीय महिला खेळाडूंमध्ये सिंधू सर्वाधिक कमाई करणारी खेळाडू ठरली आहे. फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या 15 महिला खेळाडूंमध्ये सिंधू एकमेव भारतीय आहे. पीव्ही सिंधू 2019 मधील कमाईच्या बाबतीत जगात 13 व्या स्थानावर आहे.
साल 2019 च्या फोर्ब्सच्या अहवालानुसार सिंधूने जाहिराती आणि स्पर्धांमध्ये बक्षीस रक्कम असे एकूण ($ 5.5 दशलक्ष)39 कोटी रुपये कमावले होते. त्यावेळी सिंधू जाहिरातींसाठी दिवसाला 1 ते 1.5 कोटी रुपये आकारत असे. 2019 मध्ये सिंधूचे वार्षिक उत्पन्न सुमारे 40 कोटी रुपये होते. जे 2020 मध्ये वाढून 55 कोटी झाले. तिच्या संपत्तीचे एकूण मूल्य 72 कोटी रुपये आहे.
स्पोर्ट्स वेबसाइटच्या अहवालानुसार जाहिरातींमधून कमाईच्या बाबतीत सिंधू भारतीय खेळाडूंमध्ये क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या मागे आहे.
सिंधू विविध कंपन्यांचे, संस्थांची जाहिरात करते. त्यासाठी ती घसघशीत रक्कम देखील आकारते. तिच्याकडे मूव्ह, स्टेफ्री, व्हिसा, फ्लिपकार्ट, बुस्ट, नोकिया, बँक ऑफ बडोदा, पॅनासोनिक इत्यादी ब्रँडच्या जाहीराती आहेत. ती केंद्रीय राखीव दलाची ब्रॅण्ड अँम्बेसडर देखील आहे.
आता सलग दुसऱ्या ऑलम्पिक पदकानंदर तिची ब्रॅण्ड व्हॅल्यू आणखी वाढणार यात शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
संघाला पहिला वनडे विजय ज्यादिवशी मिळवून दिला, त्याच्या बरोबर ३ वर्षांनी कर्णधाराने घेतली निवृत्ती