बुधवारी, आज 1 आॅगस्टला चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत दुसरी फेरी पार पडली. या फेरीत भारताच्या किदंबी श्रीकांत, पीव्ही सिंधू, साई प्रणीतने तिसऱ्या फेरीत (उपउपांत्यपूर्व फेरी) प्रवेश केला आहे.
आजच्या दिवसाची सुरुवात श्रीकांतने विजयाने केली होती. मात्र त्यानंतर भारतासाठी आजचा दिवस संमिश्र राहिला. भारताच्या एचएस प्रणॉय आणि समीर वर्मा यांचे आव्हान संपले आहे.
पुरुष एकेरीत श्रीकांतने स्पेनच्या पाबलो अबियनवर 21-15,12-21,21-14 अशा फरकाने मात करत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतने पहिला सेट सहज जिंकला होता. मात्र त्याला दुसऱ्या सेटमध्ये त्याला संघर्ष करावा लागला. पण त्याने तिसऱ्या सेटमध्ये सामन्यात पुनरागमन करत हा सामना जिंकला.
तसेच पीव्ही सिंधूने मात्र आज जास्त संघर्ष करावा लागला नाही. तिने महिला एकेरीत इंडोनेशियाच्या फित्रियानी फित्रियानीवर 35 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-14,21-9 अशा फरकाने मात केली.
पुरुष एकेरीत साई प्रणीतने स्पेनच्या लुईस एन्रीक पेआनवेर सहज मात केली. त्याने पहिल्या सेटमध्ये 21-18 तर दुसऱ्या सेटमध्ये 21-11 अशा फरकाने विजय मिळवला.
मात्र भारताच्या प्रणॉयला ब्राझीलच्या योगर कोएलहो डी ओलिवेइराकडून 8-21,21-16,21-15 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले आहे. तर समीरला चीनच्या लीन डॅनने 21-17,21-14 अशा फरकाने पराभूत केले.
त्याचबरोबर दुहेरी गटात मात्र भारताच्या एकाही जोडीला आज विजय मिळवता आलेला नाही. पुरुष एकेरीत स्वस्तिकराज रांकारेड्डी – चिराग शेट्टी या जोडीला डेन्मार्कच्या किम अस्त्रुप – अँडर्स स्कार्प रेस्मुसेन या जोडीने 21-18,15-21,21-16 अशा फरकाने पराभूत केले.
पुरुष दुहेरीतील भारताची दुसरी जोडी मनू अत्री – सुमित रेड्डी या जोडीला सातव्या मानांकीत जपानच्या टाकुटो इनोउ- युकी कानेको विरुद्ध संघर्षपूर्ण लढतीत 22-24,21-13.21-16 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.
तसेच महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा – सिक्की रेड्डी या जोडीनेही दुसऱ्या मानांकीत जपानच्या युकी फुकुशिमा आणि सयाका हिरोता या जोडीसमोर 21-14,21-15 अशा फरकाने पराभव पत्करला.
उद्या (2 आॅगस्ट) भारतीय खेळाडूंचे असे होतील सामने-
एकेरी सामने-
पीव्ही सिंधू विरुद्ध सुंग जी ह्युन (कोरिया)
किदंबी श्रीकांत विरुद्ध डॅरेन लीउ (मलेशिया)
साई प्रणीत विरुद्ध हान्स क्रिस्टीयन सोलबर्ग विट्टीनघुस (डेन्मार्क)
सायना नेहवाल विरुद्ध रचॉनोक इंटॅनॉन (थायलंड)
मिश्र दुहेरी-
स्वस्तिकराज रांकारेड्डी-अश्विनी पोनप्पा विरुद्ध गोह सून हॉत – शेव्हन जेमी लाय (मलेशिया)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट-शिखरच्या मैत्रीसाठी पुजाराचा बळी
–पहिल्या सत्रात भारताला एक विकेट घेण्यात यश
–प्रो कबड्डी- पाटणा पायरेट्स संघाचे हे आहे नवे होम ग्राऊंड