---Advertisement---

चेन्नईविरुद्ध कर्णधार विराटने दिली सिंगापूरच्या नव्या भिडूला संधी, वाचा आरसीबीच्या पदार्पणावीराबद्दल

On: शुक्रवार, सप्टेंबर 24, 2021 8:26 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२१) दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सुरू आहे. शुक्रवार (२२ सप्टेंबर) रोजी याच टप्प्यातील सहावा आणि हंगामातील ३५वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होतो आहे. या सामन्यात बेंगलोरच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम डेव्हिडला जागा मिळाली आहे. त्याने चेन्नईविरुद्धच्या या सामन्यातून आपले आयपीएल पदार्पण केले आहे.

आयपीएल २०२१ चा हा टप्पा सुरू होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) च्या संघात मोठे बदल करण्यात आले होते. आरसीबी संघ व्यवस्थापनने ऍडम झंपा, केन रिचर्डसन, फिन ऍलन, डॅनियल सॅम्स यांच्या जागी वनिंदू हसरंगा, दुष्मंता चमिरा आणि टिम डेव्हिड यांचा संघात समावेश केला आहे. गेल्या महिन्यात भारताविरुद्ध वनडे आणि टी२० मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या हसरंगा आणि दुष्मंता चमिरा यांना बहुतेक भारतीय चाहते ओळखत असतील, मात्र टिम डेव्हिड हे भारतात फारसे परिचित नाव नाही.

आयपीएलमध्ये निवड होणारा सिंगापूरचा पहिला खेळाडू
टिम डेव्हिड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिंगापूरचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत ११ टी२० सामने आपल्या देशाकडून खेळले आहेत. डेव्हिडची टी२० सरासरी ४६.५० असून त्याचा स्ट्राइक रेट १५८ पेक्षा जास्त आहे. त्याने आत्तापर्यंत ३ अर्धशतके ठोकली आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये डेव्हिडने १५ सामन्यांमध्ये ७८.७७ च्या सरासरीने ७०९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट १२१ पेक्षा जास्त आहे. डेव्हिडने २ शतके आणि ५ अर्धशतके केली आहेत. तो आयपीएलमध्ये निवड झालेला सिंगापुरचा पहिला खेळाडू ठरला.

सरेसाठी केली चमकदार कामगिरी
टिम डेव्हिड सध्या इंग्लंडमध्ये सर्रे काउंटी संघाचे प्रतिनिधित्व करतो. नुकतेच त्याने या स्पर्धेत एक धुवाधार शतक ठोकले होते. १५ ऑगस्ट रोजी सर्रे विरुद्ध वॉर्विकशायर असा सामना रॉयल लंडन स्पर्धेत खेळला गेला. या सामन्यात सर्रे संघाचे प्रतिनिधित्व करताना डेव्हिड याने आपल्या आक्रमक फटकेबाजीने सर्व चाहत्यांचे मनोरंजन केले. डेव्हिड याने केवळ ७० चेंडूत १४० धावांची मॅचविनिंग खेळी केली. डेव्हिडने ५५ चेंडूमध्ये शतक साजरे केले होते. त्याने या खेळीदरम्यान ९ चौकार व ११ षटकारांची आतिषबाजी केली. त्याच्या १४० पैकी १०२ धावा या चौकार व षटकारांनी आल्या होत्या.

अशात आपल्या आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात तो कशी कामगिरी करतो यावर सर्वांच्या नजरा असतील.

महत्त्वाच्या बातम्या-

CSKvsRCB, Live: अखेर नाणेफेकीचा मुहूर्त लागला, धोनीने टॉस जिंकत निवडली गोलंदाजी; ‘असे’ आहेत दोन्ही संघ

व्यंकटेशमधील छुप्या सिताऱ्याला ‘त्या’ व्यक्तीने वयाच्या सातव्या महिन्यात ओळखले होते, आईचा खुलासा

“मी माझ्या ७ वर्षांच्या कॅप्टन्सीत गेल, कोहली किंवा डीविलियर्स नव्हे तर फक्त ‘त्याच्या’साठी रणनिती आखली”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---