---Advertisement---

सिंगापूर ओपन २०२२: ३२ मिनिटांतच विरोधी खेळाडूचा धुव्वा उडवत पीव्ही सिंधूने फायनलमध्ये मारली धडक

PV Sindhu
---Advertisement---

सिंगापूर ओपनच्या स्पर्धेतून भारतासाठी चांगली बातमी समोर आली आहे. या स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीचा सामना शनिवारी (१६ जुलै) रंगला. या सामन्यात स्टार बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूने बाजी मारली असून ती अंतिम फेरीत पोहोचली आहे. तिने उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानच्या एस कावाकामीचा २१-१५, २१-७ असा पराभव केला आहे.

या सामन्यात पीव्ही सिंधू (PV Sindhu) हीने तिचे वर्चस्व सुरूवातीपासूनच ठेवले होते. यामुळे साइना कावाकामी (Saena Kawakami) याने बऱ्याच चुका केल्या ज्याचा फायदा सिंधून चांगलाच उचलला आहे. सिंगापूर ओपन २०२२ उपांत्य फेरीचा सामना ३२ मिनिटे चालला.

पहिल्या सेटमध्ये सिंधू काहीवेळा मागे राहिली होती. यावेळी तिने चांगला खेळ करत सेटमध्ये मुसंडी मारली आहे. सेट १८-१४ असा तिने १ गेम पॉईंट जिंकला तसेच दोन व्हिडिओ रेफरलही जिंकले. याच दरम्यान कावाकामीने केलेल्या दोन अनफोर्स्ड एररचा सिंधूने फायदा उचलत पहिला सेट २१-१५ असा आपल्या नावे केला आहे.

दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने दर्जेदार खेळ करत सामना सहज जिंकला. ती या सेटमध्ये १९-६ अशी आघाडीवर होती. या सेटमध्ये तिने फोरहॅण्ड आणि बॅकहॅण्डचे शॉट्स उत्तम खेळले. सिंधू आणि कावाकामी या आतापर्यंत दोन वेळा आमनेसामने आल्या आहेत. या दोन्ही सामन्यात सिंधूच वरचढ ठरली आहे. हा सामना आणि २०१८च्या चायना ओपनमध्ये त्या एकमेकाविरोधात आल्या होत्या.

दोन वेळेची या ऑलम्पिक विजेती असलेली पीव्ही सिंधू हिने यावर्षी दोन सुपर ३००च्या स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने यावर्षी झालेल्या सईद मोदी आंतरराष्ट्रीय आणि स्वित्झर्लंडच्या योनक्स स्विस ओपनचे विजेतेपद जिंकले आहेत.

हैद्राबादची ही २७ वर्षीय खेळाडू आणि एशियन चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदक जिंकणारी सिंधू यावर्षीच्या पहिल्या सुपर ५००चे विजेतेपद जिंकण्यापासून आता फक्त एकच पाऊल दूर आहे.

अंतिम फेरीत सिंधूचा सामना चीनच्या वांग झी यी हिच्याशी रविवारी (१७ जुलै) होणार आहे. दोन वेळेची कॉमनवेल्थ विजेती सिंधू २८ जुलैला होणारी बर्मिंघम येथे होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

खराब फॉर्मातील विराट करू लागला ‘राम’ नामाचा जप, अनुष्कासोबतचा फोटो व्हायरल

भावा तुझं काय मध्येच! विराट आणि बाबरच्या विषयात आफ्रिदीची ढवळाढवळ, म्हणाला…

टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये मोडीत निघणार ‘हे’ १० विक्रम, वाचा भारत कोणत्या बाबतीत आहे आघाडीवर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---