भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात पुनर्निधारीत पाचवा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना ऍजबस्टन येथील मैदानावर खेळला जात आहे. भारतीय संघ या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने पुढे आहे. तसेच पाचव्या सामन्यातही भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाकडे ३०२ धावांची आघाडी आहे. दरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने इंग्लंडविरुद्धची ही मालिका जिंकणे अविस्मरणीय क्षण असेल, असे म्हटले आहे.
सिराजने (Mohammad Siraj) भारतीय संघाच्या (Team India) २०२१ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयाच्या आठवणींना उजाळा देत ही प्रतिक्रिया (Mohammad Siraj On Test Series Win) दिली आहे. तो म्हणाला की, “२०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणे अविस्मरणीय क्षण होता. इंग्लंडविरुद्धही जर आम्हाला मालिकेत विजय मिळाला, तर ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल.”
पुढे बोलताना सिराजने ऍजबस्टन येथे झालेल्या पावसाचा भारतीय संघाला फायदा झाला असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला की, “पावसामुळे भारताच्या गोलंदाजांना विश्रांती करण्याची संधी मिळाली. ही बाब आमच्यासाठी फायदेशीर ठरली. याबरोबरच पाऊस पडून गेल्यानंतर चेंडू रिव्हर्स स्विंग होत नाहीय. चेंडू खालीच राहात आहे. त्यामुळे जसजसा सामना पुढे जात आहे, तसतसा भारतीय संघाला फायदा होत आहे.”
मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी
दरम्यान सिराजने इंग्लंडविरुद्ध किफायतशीर गोलंदाजी केली. त्याने इंग्लंडच्या पहिल्या डावात ४ फलंदाजांना बाद केले. ११.३ षटके गोलंदाजी करताना त्याने ६६ धावा देत या ४ विकेट्स घेतल्या. यादम्यान त्याने २ षटके निर्धावही टाकली. त्याने इंग्लंडचा घातक फलंदाज जो रूट याला यष्टीरक्षक रिषभ पंतच्या हातून झेलबाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. त्यानंतर सॅम बिलिंग्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि मॅटी पॉट्स यांच्या विकेट्स त्याने काढल्या. त्याच्या या प्रदर्शनामुळे भारतीय संघ इंग्लंडला पहिल्या डावात २८४ धावांवरच रोखण्यात यशस्वी ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चेंडूच ‘असा’ होता की…, पाहा विराटच्या सपोर्टमध्ये काय म्हणाला इंग्लंडचा माजी फिरकीपटू
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने पंतची तुलना थेट ब्रायन लाराशी केली, म्हणाला…