---Advertisement---

‘कसोटीची डेब्यू कॅप मिळाली, मात्र एक खंत राहीलच’, मोहम्मद सिराज हळहळला

On: बुधवार, जून 8, 2022 3:09 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये जिंकलेल्या त्या ऐतिहासिक कसोटी मालिकेला यंदा एक वर्ष पूर्ण झाले आहे. ही मालिका भारतीय चाहत्यांच्या नेहमीच लक्षात राहणार आहे. त्यातील ‘गाबा कसोटी’ ही अविस्मरणीय ठरली कारण ही कसोटी जिंकताच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.

या मालिकेत मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) मेलबर्न कसोटी सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केले होते. तो ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचला त्यानंतर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. यामुळे पहिल्या कसोटी सामन्यावेळी त्याच्या डोक्यात वडीलांचाच विचार सुरू होता असे त्याने म्हटले असून, ‘पदार्पण करताना माझ्या वडीलांनी मला पाहायला हवे होते’ अशी इच्छाही त्याने मालिकेनंतर दर्शवली आहे.

वडीलांच्या जाण्याचे सिराजला दु:ख झाले होते, मात्र त्यावेळी त्याने भारतीय संघात राहण्याचा निर्णय घेत मालिकेत उत्तम कामगिरी केली. त्यातच शेवटच्या ‘करो वा मरो’ गाबा कसोटीमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली ही मालिका भारताने  २-१ अशी जिंकली होती.

सिराजने गाबा कसोटीमध्ये (Gabba Test) एकूण सहा विकेट्स घेतल्या होत्या. त्यातील दुसऱ्या डावात मार्नस लॅब्युशेन, स्टिव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेड यांना बाद करत पाच विकेट्स घेतल्या होत्या.

पदार्पणाच्या सामन्यात सिराजने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने मेलबर्नच्या सामन्यात दुसऱ्या डावात ३७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या. तर या सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतल्या होत्या. हा सामना भारताने ८ विकेट्सने जिंकला होता.

या मालिकेनंतर सिराजने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मुलाखत देताना म्हणाला, “आयपीएलच्या दरम्यान माझे वडील गंभीर आजारी होते. हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण क्षण होता. माझ्या कुटुंबाने मला याविषयी कोणतीच कल्पना दिली नव्हती. जेव्हा मला वडीलांच्या स्वाथ्याबद्दल कळाले तेव्हा मी ऑस्ट्रेलियामध्ये होतो.”

सराव सामने झाल्यावर सिराजचे वडील गेले तेव्हा कोरोनाच्या नियमांमुळे त्याला घरी येता आले नाही. यावेळी आईने मला खूप आधार दिला याबाबत बोलताना तो म्हणाला, “मला आईने वडीलांचे स्वप्न पूर्ण कर आणि भारताचे नाव मोठे कर असे म्हणत धीर दिला.”

मोहम्मद शमी दुखाापतग्रस्त झाल्यावर सिराजला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. याआधी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात इंडिया ए कडून दोन सामने खेळताना ८ विकेट्स घेतल्या होत्या. या प्रदर्शनाच्या जोरावर त्याची अंतिम अकरामध्ये निवड झाली.

या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या यादीत पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूडनंतर सिराज तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने ३ कसोटी सामने खेळत २.८५च्या इकॉनॉमी रेटने १३ विकेट्स घेतल्या होत्या.

सिराजने ऑस्ट्रेलियानंतर इंग्लंडमध्येही चमकदार कामगिरी सुरूच ठेवली. त्याने इंग्लंड विरुद्ध ४ सामने खेळताना १४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याची इंग्लंड दौऱ्यात जुलै महिन्यात खेळल्या जाणाऱ्या या एकमात्र कसोटीमध्ये संघात जागा पक्की झाली आहे. या मालिकेतील चार सामने झाले असून भारत २-१ने पुढे आहे.

महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाने १५ वर्षांनंतर केली इतिहासाची पुनरावृत्ती, श्रीलंकेवर केली १० गडी राखत मात

‘एवढ्या गरमीत जिंवत कसे राहतात’, दिल्ली टी२०आधी चाहत्याच्या कमेंटवर शम्सीचे भन्नाट उत्तर

‘…म्हणून रोहित शर्मा उत्कृष्ट कर्णधार,’ बेबी एबीने गायले हिटमॅनचे गोडवे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---