---Advertisement---

अवघ्या १५० चेंडूत ३५० धावा करणारा फलंदाज करतोय भारताविरुद्ध पदार्पण, जाणून घ्या त्याच्याविषयी

On: शुक्रवार, मार्च 26, 2021 4:56 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्याला पुणे येथे सुरुवात झाले. तीन सामन्यांच्या मालिकेत सध्या भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. दुखापतीमुळे इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गनने उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्याजागी लियाम लिव्हींगस्टोनला संधी देण्यात आली असून, हा त्याचा पहिलाच आंतरराष्ट्रीय वनडे सामना आहे. इंग्लंडच्या या नव्या भिडूविषयी आपण जरा जाणून घेऊया.

विक्रमी खेळी करत आला होता नजरेत
सध्या २७ वर्षाचा असलेला लिव्हींगस्टोन इंग्लिश काउंटीमध्ये लँकेशायरचे प्रतिनिधित्व करतो. आक्रमक फलंदाजीसोबत लेग स्पिन आणि ऑफ स्पिन अशा दोन्ही प्रकारच्या गोलंदाजी करण्यात त्याचा हातखंडा आहे. लिव्हींगस्टोन २०१५ मध्ये त्यावेळी चर्चेत आला ज्यावेळी त्याने नॅटविच या आपल्या क्लबसाठी वनडे सामन्यात खेळताना अवघ्या १३८ चेंडूमध्ये ३५० धावा फटकावल्या. जो आजही एक विक्रम आहे.

चांगल्या फॉर्ममध्ये आहे लिव्हींगस्टोन
लिव्हींगस्टोन टी२० चा एक आदर्श खेळाडू मानला जातो. त्याने इंग्लंडसाठी आत्तापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. सोबतच ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध व्यवसायिक टी२० लीग बिग बॅशमध्ये तो पर्थ स्कॉर्चर्सचे प्रतिनिधित्व करतो. त्याने बिग बॅश लीगच्या मागील हंगामात १४ सामने खेळताना १३४ च्या स्ट्राईक रेटने ४२६ भावा फटकावल्या. यात २८ षटकारांचा समावेश होता. सोबतच त्याने ५ बळी देखील आपल्या नावे केले होते. त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये मुलतान सुलतान्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

आयपीएल खेळण्याचा अनुभव
लिव्हींगस्टोनला भारतात खेळण्याचा अनुभव देखील आहे. तो २०१९ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल संघाकडून खेळला होता. त्या हंगामात त्याने ४ सामन्यात १४५ च्या स्ट्राइक रेटने ७० धावा बनविल्या होत्या. यावर्षी तो पुन्हा राजस्थानकडून आयपीएल खेळताना दिसेल. नुकत्याच संपलेल्या टी२० मालिकेसाठी त्याचा इंग्लंड संघात समावेश होता मात्र त्याला संधी मिळाली नव्हती.

इंग्लंडकडून वनडे सामन्यात पदार्पण केल्यानंतर आता तो या सामन्यात कशी कामगिरी करतो याकडे सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

वनडे पदार्पणासाठी त्याने अजून काय करायला हवं? सूर्यकुमारला संधी न दिल्याने चाहत्यांचा विराटला प्रश्न

पुढचा विराट म्हटला गेलेला उन्मुक्त चंद अचानक गायब कसा झाला?

कौतुकास्पद! लग्नाला अवघे १० दिवस झाले असतांनाही संजना गणेशन कामावर रुजू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---