भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी अनेक खळबळजनक दावे करत भारतीय क्रिकेटमध्ये भूकंप आणला आहे. एका स्टिंग ऑपरेशन मध्ये त्यांनी असे काही खुलासे केले आहेत, ज्यामुळे आगामी काळात भारतीय क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी घडून येऊ शकतात. या स्टिंग ऑपरेशनमध्ये भारतीय क्रिकेटच्या वर्तमान काळात घडत असलेल्या अनेक गोष्टींचे खुलासे त्यांनी केले. खेळाडूंचा फिटनेस ते खेळाडूंमधील अनेक वाद या मुद्द्यावर ते बोलताना दिसत आहेत. या संपूर्ण स्टिंग ऑपरेशनमधील महत्त्वाचे मुद्दे नक्की काय आहेत यावर एक नजर टाकूया.
1. खेळाडू घेतात इंजेक्शन
चेतन शर्मा यांनी या संपूर्ण स्टिंग ऑपरेशनमध्ये ज्या एका मुद्द्यावर विस्तृतपणे म्हणणे मांडले ते म्हणजे खेळाडूंचा फिटनेस. अनेक प्रमुख भारतीय खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही 80-85 टक्केच तंदुरुस्त असताना, डोपिंगच्या कक्षेत न येणारी इंजेक्शन घेऊन आपण पूर्ण तंदुरुस्त असल्याचे दाखवतात.
2. विराट-गांगुली वाद
विराट कोहली याने टी20 संघाचे नेतृत्व सोडले तेव्हा सर्व गांगुली यांनी त्याला याचा पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. मात्र, विराटने त्यानंतर पत्रकार परिषदेत आपल्याला कोणीही विनंती न केल्याचे म्हटले होते. मात्र, ही चर्चा नऊ जणांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत झाल्याचे शर्मा यांनी म्हटले.
3. जसप्रीत बुमराहची दुखापत-
जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी पूर्ण तंदुरुस्त नव्हताच. त्याला खेळवायची घाई केली आणि आता त्याचे करिअर धोक्यात आले आहे. तो नीट वाकू देखील शकत नव्हता.
4. भारतीय खेळाडू माझ्या घरी येतात-
सध्या अनेक भारतीय खेळाडू उत्कृष्ट आहेत. रोहित शर्माने माझ्यासोबत जवळपास अर्धा तास फोनवरून चर्चा केलेली. हार्दिक पंड्याने तर माझ्या सोफ्यावर झोपून मला सर्व गोष्टी सांगितलेल्या. उमेश यादव व दीपक हुडा हेदेखील माझ्या घरी आलेले आहेत.
5. संजू सॅमसनच्या बाबतीत आमच्यावर दबाव-
संजू सॅमसन याला बाहेर केल्यास आमच्यावर मोठा दबाव असतो. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याला संधी न मिळाल्यास ट्विटरवर लोक आम्हाला ट्रोल करतात.
6. रोहितला आम्ही कर्णधार बनवले-
सौरभ गांगुली हा रोहित शर्माच्या बाजूने नव्हता मात्र त्याचा विराट कोहलीला विरोध होता. रोहितला कर्णधार बनवण्याचा निर्णय सर्वस्वी आमचा राहिला.
(Six Main Points In Chetan Sharma Sting Operation About Indian Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कोहली खोटं बोलला, 9 लोक साक्षीला आहेत’, विराट-गांगुली वादावर चेतन शर्मांचा मोठा दावा
‘आम्ही पाच जण संपूर्ण भारताचे क्रिकेट चालवतो’, स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मांची बडी बात