पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग (Womens Premier League) अर्थात महिला आयपीएलसाठीचा लिलाव सोमवारी (13 फेब्रुवारी) पार पडला. या लिलावात देश विदेशातील अनेक महिला खेळाडूंवर मोठी बोली लागलेली दिसली. त्याचवेळी या स्पर्धेत संघ खरेदी केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Banglore) फ्रॅंचाईजीने एक मजबूत संघ उभारण्याचा प्रयत्न केला. भारतीय उपकर्णधार स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिच्यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनेक प्रसिद्ध खेळाडू आरसीबीने आपल्या संघात सामील करून घेतले. त्यानंतर आता फ्रॅंचाईजीने आणखी एक मोठा निर्णय घेत सर्वांना चकित केले आहे. आरसीबीने डब्लूपीएलसाठी भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) हिला मेंटर म्हणून नियुक्त केले.
आरसीबीने आपल्या सोशल मीडिया हँडल वरून याबाबतची अधिकृत घोषणा केली.
‘खेळाडूंना एक मार्गदर्शक आणि प्रेरणा म्हणून आम्ही सानियाला आरसीबीचा भाग बनवत आहोत.’
The pioneer in Indian sports for women, a youth icon, someone who has played Bold and broken barriers throughout her career, and a champion on and off the field. We are proud to welcome Sania Mirza as the mentor of the RCB women’s cricket team. ????#PlayBold @MirzaSania pic.twitter.com/eMOMU84lsC
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) February 15, 2023
आरसीबीचे मेंटरपद मिळाल्यानंतर बोलताना स्वतः सानिया म्हणाली,
“मी आरसीबीचा भाग होऊन खरंच आनंद आहे. माझ्याकडे हा प्रस्ताव आला तेव्हा मी चकित होते. मात्र, आता निवृत्तीनंतर युवा खेळाडूंना प्रेरित करणे व त्यांनी खेळामध्ये कारकीर्द घडवावी यासाठी माझा प्रयत्न असेल. त्यामुळे आरसीबीसह मी नक्कीच युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करेन.”
भारताची सर्वकालीन महान टेनिसपटू असलेल्या सानियाने नुकतीच आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दुबई इंटरनॅशनलनंतर ती सर्व प्रकारच्या टेनिसमधून बाजूला होईल. सानियाने आपल्या कारकिर्दीत तब्बल सहा ग्रँड स्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला होता.
WPL 2023 साठी आरसीबी संघ –
स्मृति मंधाना, सोफी डिवाइन, एलिस पेरी, रेणुका सिंह, रिचा घोष, एरिन बर्न्स, दिशा कासट, इंद्राणी रॉय, श्रेयंका पाटील, कनिका आहूजा, आशा शोभना, हीदर नाइट, डेन वॅन नीकेर्क, प्रीति बोस, पूनम खेमनार, कोमल झंझाड, मेगन शूट, सहाना पवार
(Tennis Legend Sania Mirza Join RCB As Mentor In WPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कोहली खोटं बोलला, 9 लोक साक्षीला आहेत’, विराट-गांगुली वादावर चेतन शर्मांचा मोठा दावा
‘आम्ही पाच जण संपूर्ण भारताचे क्रिकेट चालवतो’, स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मांची बडी बात





