इंग्लंड आणि पाकिस्तान संघामध्ये ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघामध्ये 8 जुलै रोजी कार्डिफमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. हा सामना इंग्लंडने ९ विकेट्सने जिंकला. विशेष म्हणजे या सामन्यातून एकूण ६ खेळाडूंनी एकदिवसीय पदार्पण केले.
पहिल्या सामन्यादरम्यान इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या वेळी त्याने इंग्लंड संघात ११ बदल असल्याचे सांगताना ५ खेळाडू पदार्पण करत असल्याची माहिती दिली. तर पाकिस्तानकडून १ खेळाडूने एकदिवसीय पदार्पण केले.
इंग्लंड संघाकडून जॅक क्रॉली, ब्रायडन कार्से, लुइस ग्रेगरी, फिलिप सॉल्ट आणि जॉन सिम्पसन या ५ खेळाडूंनी इंग्लंड संघाकडून पदार्पण केले. त्याचबरोबर पाकिस्तान संघाकडून सउद शकील या खेळाडूने एकदिवसीय पदार्पण केले आहे.
इग्लंडचा एक संघ आयसोलेशनमध्ये
खरंतर पाकिस्तानविरुद्धची वनडे मालिका सुरु होण्याच्या दोन दिवसापूर्वी इंग्लंडच्या एकदिवसीय संघातील सात सदस्यांना कोरोनाची लागण झाली. ज्यामुळे इंग्लंडचा संपूर्ण एकदिवसीय संघातील खेळाडूंना आयसोलेट व्हावे लागले. त्यामुळे एका रात्रीत इंग्लंड क्रिकेट बोर्डाला एक नवा संघ उभा करावा लागला. इंग्लंडने या नव्या खेळाडूंच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अनुभवी बेन स्टोक्सवर टाकली.
इंग्लंडचा विजय
पहिल्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानकडून खराब फलंदाजीचे प्रदर्शन झाले. पाकिस्तानचा डाव ३५.२ षटकात १४१ षटकात संपुष्टात आला. त्यांच्याकडून फखर जमानने सर्वाधिक ४७ धावा केल्या. तर शादाब खानने ३० धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंड संघाकडून शाकिब महमूदने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर क्रेग ओव्हरटन आणि मॅथ्यू पार्किंसनने प्रत्येकी २ विकेट घेतले. तर लुईस ग्रेगरीने १ विकेट घेतली.
त्यानंतर १४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडकडून डेव्हिड मलान आणि जॅक क्रॉली यांनी नाबाद अर्धशतके झळकावत इंग्लंडला २२ व्या षटकातच विजय मिळवून दिला. मलानने नाबाद ६८ आणि क्रॉलीने नाबाद ५८ धावा केल्या. तसेच पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीला एकमेव विकेट मिळाली.
महत्त्वाच्या बातम्या –
सौरव गांगुलीने निवडला आपला सर्वकालीन संघ, ‘या’ दोन भारतीयांना दिले स्थान, तर पॉन्टिंगला केले कर्णधार
मोठी बातमी! टोकियो ऑलिंपिकविषयी मोठा निर्णय, प्रेक्षक मुकणार जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेला
ठरलं तर! आणखी ‘इतके’ वर्षे धोनी खेळणार सीएसकेकडून, सीईओ काशी विश्वनाथन यांनी दिली माहिती