टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना बुधवारी (दि. 09 नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडला. सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तान संघाने अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तानने थेट अंतिम सामन्याचे तिकीट मिळवले. तसेच, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. विशेष म्हणजे, तो अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार ठरला.
सामन्याचा आढावा
पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावत 152 धावा चोपल्या. यावेळी न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेल (नाबाद 53) आणि कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) (46) यांनाच सर्वाधिक धावा करता आल्या. त्यांच्याव्यतिरिक्त कुणालाही समाधानकारक धावसंख्या उभारता आली नाही. न्यूझीलंडचे 153 धावांचे आव्हान पाकिस्तानने 19.1 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केले आणि अंतिम सामन्यात धडक दिली.
We are in the T20 World Cup final! 🤩#WeHaveWeWill | #T20WorldCup | #NZvPAK pic.twitter.com/UfRbbcEbjb
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 9, 2022
बाबर आझमचा विक्रम
पाकिस्तानकडून फलंदाजी करताना सलामीवीर मोहम्मद रिझवान (57) आणि कर्णधार बाबर आझम (53) यांनी अर्धशतक झळकावले. तसेच, मोहम्मद हॅरिस याने 30 धावांचे योगदान दिले. यावेळी बाबरने झळकावलेल्या अर्धशतकामुळे त्याच्या नावावर खास विक्रम नोंदवला गेला. यावेळी बाबर आझम (Babar Azam) हा टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत यशस्वीरीत्या धावांचा पाठलाग करताना अर्धशतक झळकावणारा पहिला कर्णधार बनला.
Babar Azam steps it up in the big game 👊#T20WorldCup | #NZvPAK | 📝: https://t.co/LSzHXLPBTN pic.twitter.com/5SytI0tBSW
— ICC (@ICC) November 9, 2022
बाबर आझमची टी20 विश्वचषकातील कामगिरी
बाबर आझम याने या विश्वचषकाच्या सुरुवातीपासून खास कामगिरी केली नव्हती. मात्र, तो उपांत्य सामन्यात चांगलाच चमकला. बाबरने आतापर्यंत 6 सामने खेळले. यामध्ये त्याने फक्त 15.33च्या सरासरीने 92 धावा चोपल्या. यामध्ये एका अर्धशतकाचाही समावेश होता. हे अर्धशतक त्याने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झळकावले होते. यावेळी 53 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. (Skipper Babar Azam becomes the first captain to score a Fifty in a successful chase in WT20 Knockouts)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहितची मोठी हिंट! सांगूनच टाकलं, पंत अन् कार्तिकपैकी इंग्लंडविरुद्ध कोणाला उतरवणार
टी20 क्रमवारीत सूर्या अव्वल स्थानावर कायम! केएल राहुल आणि अर्शदीप सिंगला फायदा, विराट 11व्या स्थानावर