क्रिकेट जगतातील दोन बलाढ्य संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ऍशेस मालिका 2023मध्ये एकमेकांविरुद्ध भिडत आहेत. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात या मालिकेतील दुसरा सामना ‘क्रिकेटची पंढरी’ म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानात 28 जून ते 2 जुलैदरम्यान खेळला गेला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने 43 धावांनी जिंकला. मात्र, या सामन्यानंतर जॉनी बेअरस्टो याला वादग्रस्त पद्धतीने बाह करण्यावरून सुरू झालेला वाद आता थांबायचे नाव घेत नाहीये. अद्याप खेळाडूंमधील शाब्दिक वाद पाहायला मिळत होता. आता दोन्ही देशांच्या मीडियानेही यामध्ये उडी घेतली आहे. इंग्लंडच्या वृत्तपत्रांनी ऑस्ट्रेलिया संघावर निशाणा साधल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानेही इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्यावर निशाणा साधला. मात्र, त्यानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राने लॉर्ड्स कसोटी (Lord’s Test) सामन्यात जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याच्या बाद होण्याच्या वादावर पहिल्या पानावर बेन स्टोक्स (Ben Stokes) याचा फोटो छापला आहे. खरं तर, या फोटोत स्टोक्सचा एका रडतानाच्या बाळाच्या रूपात फोटो छापला आहे. ज्याच्या तोंडात दुधाच्या बॉटलचे तोंड लागल्याचे दिसत आहे. तसेच, खाली डायपर आहे. यासोबतच ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने “क्रायबेबीज”, म्हणजेच रडणारे बाळ अशी हेडलाईन दिली आहे.
बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियन मीडियाला प्रत्युत्तर दिले
स्टोक्सनेही ऑस्ट्रेलियन मीडियाच्या या फोटोवर ट्वीट करत सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्याने ट्वीट करत लिहिले की, “हा मी बिल्कुलच असू शकत नाही. मी कधीपासून नवीन चेंडूने गोलंदाजी सुरू केली?”
That’s definitely not me, since when did I bowl with the new ball https://t.co/24wI5GzohD
— Ben Stokes (@benstokes38) July 3, 2023
बेअरस्टोच्या बाद होण्यामुळे वादाला सुरुवात
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (England vs Australia) संघात नुकत्याच पार पडलेल्या लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या निकालापेक्षा जास्त चर्चा जॉनी बेअरस्टो याच्या बाद होण्याबाबत रंगली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यानेही सामन्यानंतर म्हटले होते की, जर ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान असे काही झाले असते, तर इंग्लंड संघाने आपली अपील मागे घेतली असती.
खरं तर, जॉनी बेअरस्टो हा लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी वादग्रस्त पद्धतीने बाद झाला होता. कॅमरून ग्रीन याचा एक उसळी चेंडू खेळल्यानंतर चेंडू ऍलेक्स कॅरे याच्या हातात गेला होता. त्यानंतर बेअरस्टो आपल्या कर्णधाराशी बोलण्यासाठी क्रीझच्या बाहेर निघाला होता. याचदरम्यान कॅरेने लगेच चेंडू स्टंप्सच्या दिशेने फेकला आणि बेल्स पडल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने बाद होण्यासाठी अपील केली, ज्यावर तिसऱ्या पंचांनीही बेअरस्टोला बाद घोषित केले. यानंतरपासून हा वाद सुरू झाला आणि थांबायचं नाव घेत नाहीये. (skipper ben stokes gives hilarious response to australian news paper must read here)
महत्वाच्या बातम्या-
रैनाचा विराटबाबत मोठा खुलासा! म्हणाला, “आम्ही खेळत असताना तो नेहमी…”
‘ऍशेस वॉर’ पेटले! आता थेट इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानाच आमनेसामने