---Advertisement---

Video : विरोधी संघात असणाऱ्या आपल्या भावाला हार्दिककडून कडकडून मिठी, जर्सीही केली अदलाबदल

On: रविवार, एप्रिल 23, 2023 10:26 AM
Hardik-Pandya-And-Krunal-Pandya
---Advertisement---

क्रिकेटमध्ये भावांच्या अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांनी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यात भारतीय संघाचे धुरंधर हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांचाही समावेश आहे. ही भावांची जोडी सध्या आयपीएल 2023 स्पर्धेत खेलत आहे. मात्र, हे दोघेही वेगवेगळ्या संघाकडून खेळत आहेत. हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करत आहे, तर कृणाल पंड्या लखनऊ सुपर जायंट्स या संघाचा खेळाडू आहे. या संघात आयपीएलचा 30वा सामना लखनऊ येथे पार पडला. हा सामना गुजरात संघाने अखेरच्या षटकात 7 धावांनी जिंकला. या पराभवानंतर हार्दिक पंड्या भाऊ कृणालसोबत प्रेमळ क्षण घालवताना दिसला. दरम्यानचा व्हिडिओही हार्दिकने शेअर केला.

हार्दिक आणि कृणालचा व्हिडिओ
लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडिअम येथे लखनऊ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स (Lucknow Super Giants vs Gujarat Titans) संघात खेळला गेला. या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना लखनऊपुढे 136 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वातील लखनऊ संघाला 20 षटकात 7 विकेट्स गमावत 128 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांना हा सामना 7 विकेट्सने गमवावा लागला. विजयानंतर हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या (Hardik Pandya And Krunal Pandya) यांचे बंधूप्रेम पाहायला मिळाले.

दोघेही भाऊ आयपीएलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळत असतील, पण दोघांमध्ये एकमेकांसाठी प्रेम आणि आदर आधीसारखाच कायम आहे. हार्दिकने दोघांचा हा व्हिडिओ स्वत:च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हार्दिक आणि कृणाल या व्हिडिओत एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. तसेच, एकमेकांची जर्सी अदलाबदल करत आहेत. हार्दिकने घातलेली जर्सी त्याने कृणालला दिली, तर कृणालने त्याच्या अंगातील जर्सी हार्दिकला दिली. यानंतर दोघेही एकमेकांची गळाभेट घेतानाही दिसले.

https://twitter.com/hardikpandya7/status/1649803111224217601?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1649803111224217601%7Ctwgr%5Eb9fcfdf9dd5c1c854c3bd61d2a126ca3fa13b5ef%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.sportzwiki.com%2Fcricket%2Fhardik-pandya-hugged-krunal-pandya-after-defeating-his-team-lsg-vs-gt-ipl-2023%2F

चाहत्यांना पंड्या बंधूंचा हा व्हिडिओ खूपच आवडला असून ते त्यावर लाईक्स आणि कमेंट्समार्फत प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सामन्यातील या भावांच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर हार्दिकने गुजरातसाठी शानदार फलंदाजी केली. त्याने 50 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 66 धावा केल्या. तसेच, कृणालने लखनऊकडून फलंदाजी करताना 23 धावा केल्या. याव्यतिरिक्त गोलंदाजी करताना 4 षटकात 16 धावा खर्च करत 2 विकेट्सही नावावर केल्या. (skipper hardik pandya hugged brother krunal pandya after defeating his team lsg vs gt ipl 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या बालेकिल्ल्यात अर्शदीपचा राडा, 20व्या षटकात दोन चेंडूंवर मोडला धुरंधराचा स्टंप; पाहा व्हिडिओ
अर्शदीपच्या घातक यॉर्करने दोनदा मोडला मिडल स्टंप! आयपीएलला मोठे नुकसान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---