मुंबईच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 12 मे) मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्सचा रंगतदार सामना रंगणार आहे. हा सामना मुंबई आणि गुजरातसाठी खास असणार आहे. त्याचे कारण असे की, या सामन्याच्या विजयातून कोणत्यातरी एका संघाची प्ले-ऑफमधील जागा पक्की होईल.
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) गुणतालिकेच्या शीर्षस्थानी असून आत्तापर्यंतच्या 11 सामन्यांपैकी 8 सामन्यांच्या विजयाची चव चाखली असून 3 सामन्यांमध्ये हार पत्कारावी लागली आहे. शिवाय, टायटन्सचे 16 गुण झाले आहेत. टी20 लीगच्या 16व्या हंगामातील सामन्यात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखालील संघ गुजरातचा सामना आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाशी होणार असून टायटन्सने हा सामना जिंकल्यास प्ले-ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल.
आयपीएल 2023 मध्येही टायटन्सची चमकदार कामगिरी
पंड्याच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या गुजरात टायटन्सने आयपीएल 2023 (IPL 2023) मध्येही आपली क्रेझ कायम ठेवली आहे. गुणतालिकेबद्दल बोलायचे झाले, तर टायटन्स संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. तसेच, या संघाचा आज वानखेडे स्टेडियमवर 5 वेळचा विजयी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indian) सोबत सामना होणार आहे. जर गुजरातचा संघ हा सामना आपल्या नावावर करत असेल, तर प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल.
दरम्यान, गुजरात टायटन्स संघाने आयपीएल 2022 मध्ये आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. संघाने पहिल्याच सत्रात विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. टी20 लीगच्या 16व्या सिझनबद्दल बोलायचे झाले, तर टायटन्स (Gujarat Titans) संघातील 6 खेळाडू पुन्हा चॅम्पियन बनवू शकतात. पहिला शुबमन गिल (Shubman) जो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते आयपीएलपर्यंत (Indian Premier League) उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तसेच, त्याने आतापर्यंत 11 सामन्यात 47च्या सरासरीने संघासाठी सर्वाधिक 469 धावा केल्या आहेत. शिवाय यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
गुजरातच्या आतापर्यंतच्या यशामध्ये गोलंदाजांचेही मोठे योगदान आहे. संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) या दोघांनी प्रत्येकी 19 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, शमीने 11 धावांमध्ये 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. उपकर्णधार राशिदची कामगिरी पाहिली, तर त्याने हॅट्रिक घेतली आहे.
शिवाय, संघातील वेगवान गोलंदाज मोहित शर्मा (Mohit Sharma) यानेही पुनरागमन करत अप्रतिम गोलंदाजी केली आहे. तसेच, त्याने 8 सामन्यात 13च्या सरासरीने 12 विकेट्स घेतल्या आहेत. 29 धावांमध्ये 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. तसेच, 6व्या खेळाडूबद्दल बोलायचे झाले, तर या यादीमध्ये कर्णधार हार्दिक पंड्या याचा समावेश आहे. 277 धावा करण्यासोबतच पंड्याने आतापर्यंत 3 विकेट्स घेतल्या आहेत.
पुढे बोलायचे झाले, तर यामध्ये युवा फिरकी गोलंदाज नूर अहमद (Noor Ahmad) याचाही समावेश आहे. त्याने आतापर्यंत 7 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय डेविड मिलरने 9 डावात 201 धावा केल्या आहेत, तर विजय शंकरने 7 डावात 205 धावा केल्या आहेत. चालू हंगामात गुजरात टायटन्स संघाने पहिल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव केला. जर आजच्या सामन्यामध्ये मुंबईचा संघ पराभूत झाला, तर संघाला जास्तीत जास्त 16 गुणच गाठता येतील आणि अशा स्थितीत संघाला प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागेल. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा खराब फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. (skipper hardik pandya lead gujarat titans 1 win away from ipl 2023 playoffs mi vs gt)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘IPLनंतर टी20 संघात सर्वात पहिली निवड…’, जयसवालची वादळी बॅटिंग पाहून शास्त्रींचे लक्षवेधी वक्तव्य
IPLमध्ये 12 मे रोजी एकदाही हारली नाही मुंबई, स्पेशल आहे दिवस; कायरन पोलार्डशी जबरदस्त कनेक्शन