---Advertisement---

नाद करा पण हरमनप्रीतचा कुठं! सामना गमावला, पण नावावर केला विश्वविक्रम, बनली जगातली पहिली फलंदाज

On: गुरूवार, डिसेंबर 7, 2023 3:35 PM
Harmanpreet-Kaur
---Advertisement---

Harmanpreet Kaur World Record: इंग्लंडचा महिला क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात 3 सामन्यांची टी20 मालिका आणि 1 कसोटी सामना खेळला जाणार आहे. यातील पहिला टी20 सामना बुधवारी (दि. 6 डिसेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे पार पडला. हा सामना इंग्लंड संघाने 38 धावांनी जिंकला. असे असले, तरीही भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर विश्वविक्रम नावावर करण्यात यशस्वी झाली. ती आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू बनली.

या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच, इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी इंग्लंडने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 197 धावा केल्या होत्या. तसेच, भारतीय संघाला  विजयासाठी 198 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 20 षटकात 6 विकेट्स गमावत फक्त 159 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना इंग्लंडने 38 धावांनी खिशात घातला.

हरमप्रीत कौरचा विक्रम
इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच हरमनप्रीत कौर विश्वविक्रम (Harmanpreet Kaur) करण्यात यशस्वी झाली. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून हा तिचा 101वा सामना होता. अशाप्रकारे ती महिला क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळणारी खेळाडू बनली. तिने ऑस्ट्रेलियाची दिग्गज माजी कर्णधार मेग लॅनिंग हिला मागे टाकले. तिने टी20 क्रिकेटमध्ये 100 सामन्यात नेतृत्व केले होते. इंग्लंडची चार्लोट एडवर्ड्स 93 टी20 सामन्यात नेतृत्व करण्यासोबत यादीत तिसऱ्या स्थानी आहे.

हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेले सामने
हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने आतापर्यंत भारतासाठी 101 सामन्यात नेतृत्व केले आहे. यामध्ये भारतीय संघाला 57 सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच, 39 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, 1 सामन्याचा निकाल लागला नाही. दुसरीकडे, कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत मेग लॅनिंग अव्वलस्थानी आहे. तिने कर्णधार म्हणून 76 टी20 सामने जिंकले आहेत.

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात नेतृत्व करणाऱ्या महिला खेळाडू
101 सामने- हरमनप्रीत कौर*
100 सामने- मेग लॅनिंग
93 सामने- चार्लोट एडवर्ड्स
76 सामने- चमारी अट्टापट्टू
73 सामने- मेरिसा एगुइलेरा
72 सामने- हीदर नाईट

हरमनप्रीतची कारकीर्द
हरमनप्रीत कौर हिने भारतीय संघासाठी 2009मध्ये टी20 कारकीर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत तिने भारतासाठी 156 टी20 सामने खेळले आहेत. यादरम्यान तिने 28.14च्या सरासरीने 3180 धावा केल्या आहेत. यादरम्यान तिने 1 शतक आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त गोलंदाजी करताना तिने 32 विकेट्सही नावावर केल्या आहेत.

पुरुष क्रिकेटपटूंची आकडेवारी
दुसरीकडे, कुठल्याच पुरुष क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 76 पेक्षा जास्त सामन्यात संघाचे नेतृत्व केले नाहीये. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ऍरॉन फिंच याने 76 सामन्यात नेतृत्व केले आहे. पुरुष क्रिकेटमधील हा सर्वोच्च आकडा आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी एमएस धोनी आहे. त्याने 72 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. म्हणजेच, कुठल्याच पुरुष क्रिकेटपटूला 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात संघाचे नेतृत्व करता आले नाहीये. मात्र, हरमनप्रीतने ही कमाल करून दाखवली. (skipper harmanpreet kaur makes world record most t20 international matches as captain 2023)

हेही वाचा-
India Tour of South Africa: टीम इंडिया आफ्रिकेत दाखल, डोक्यावर बॅग घेऊन धावताना दिसले खेळाडू, पाहा Video
कहर! मोहम्मद आमिरचे उच्च कोटीचे प्रदर्शन, फक्त 1 ओव्हरमध्ये ‘एवढ्या’ फलंदाजांना धाडलं तंबूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---